पोस्ट्स

सप्टेंबर, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

क्षणिक

इमेज

गुलामगिरी

इमेज

माझी सखी चीमू .................

दुपारची  मस्त  पैकी झोपलेली होती. चिमण्यांच्या चिवचीवाट माझी झोप मोड करून गेला. अचानक एवढया चिमण्या घरात आल्या तरी कुठून आणि बराच वेळ थांबून सुद्धा ह्या अजून जात का नाही मनाशीच विचार केला. मी आता उठून बसली, चिमण्यांकडे बारकाईने बघू लागली . तीन चार चिमण्यांचे भांडण, मारामारी चालू होती कि त्या मस्ती करत होत्या कोण जाणे. पण बराच वेळ त्यांचा हा गोंधळ चालू होता. मला पण छान करमणूक होत होती. तसेही तेव्हा मला विशेष काहीच काम नव्हते. गरोदर पनाताला आठवा महिना , पलंगावर नुसता झोपून आराम करणे एव्हडेच तर काम होते माझ्याकडे. त्यामुळे मलाही हा छान विरंगुळा झाला . खूप वेळा नंतर त्यात दोनच चिमण्या माझ्या घरात थांबल्या बाकी साऱ्या उडून गेल्या. त्या दोघी बाहेरून कुठूनतरी काड्या कापूस आणत होत्या. आता माझ्या लक्षात आले त्या पडद्याच्या पेल्मेटच्या वळचणीत आपले घरटे बनवत होत्या. मी आता छानशी टेकून बसली चिमणीचे घरटे आता माझा तासंतासाचा करमणुकीचा भाग झाला.  दोन चिमण्या एक काळी-पिवळी, अन एक राखाडी-पिवळी. अश्या दोन रंगाच्या दोन चिमण्या माझ्या घरात मला तर फार छान वाटायला लागले , लहान पणापासून माहित होते हि नाजूक

केअर टेकर

खूप काही बोललास स्वप्नील काल तू . राग नाही आला पण दुखः झाले . तू सुद्धा समजून घेऊ शकला नाहीस. काल बोलता बोलता खूप काही बोलून गेला . म्हणजे त्या गोष्टी तू मानतोस तर ! मला वाटल आपल्या प्रेमात ह्या गोष्टीना क्षुल्लक स्थान आहे .' बाहेरख्याली पणा ' हा शब्द मनाला खूप लागला ठीक आहे तुला माझ्याबोलायाच नव्हत पण शब्द तर हाच सुचला ना तुला. प्रेम आणि प्रेमाच्या आविष्कारातून झालेली कृती बाहेरख्याली वृत्ती कशी काय असू शकते. ज्या कृतीतून मला गिळत नाही ते चूक कसे काय.? विचार करून करून सोनालीकाचे डोक फुटायची वेळ आली होती पण तिला काही उत्तर मिळेना. अचानक पायाखालची जमीनच खेचून घेतल्यासारखे तिला भासू लागले . अन जमीन खेचणारा कॉन तर तिचा जीवलगच. जीवापाड प्रेम करतो ना आपण त्याच्यावर मग त्याच्या तोंडून हे शब्द .... सर्व नकोस झालेलं असतांना कुठून तरी एक आशेचा किरण चामाकावा तसा त्याचा तिच्या आयुष्यातला प्रवेश मग अचानक सर काही सुखकारी घडतंय असा वाटणारा भास .. ओढ आतुरता ... हुरहूर सर्वाना बरोबर घेऊन एका क्षणाला पूर्ण पणे त्याचे होऊन जाण्याचे स्वप्न.... . भेटीची इच्छा ....व्याकुळता अन भेटी नंतर मिलनात

सिग्नल

खूप वर्षांपूर्वी मी हि कथा लिहिली होती पण प्रसिध्द मात्र आज करतेय ...आवडली नाही तरी तास सांगा ...लिखाणात अजून काय गोष्टी असायला हव्या होत्या तेही सांगा . --------------------------------------- सिग्नल  इवल्या इवल्या हातानी लुगड्याच्या फाडून आणलेल्या तुकड्यात ती वाळलेल्या काडक्यांची  मोळी  बांधत होती आणि  दुसर्या हाताशी मंदी....  मंदी तिची चार वर्षाची तिची लहान बहिण....मंदीने पण अंगात  असलेली सारी शक्ती लावून  बहिणीच्या डोक्यावर मोळी उचलून देण्याचा प्रयत्न केला... पण तो फसला . ती मोळी सुटली ,खाली पडली बरोबर मंदीही धडपडली. परत इवलेशे हात कामाला लागले . आता मोळी घट्ट  बांधली . पण डोक्यावर उचलणे  अशक्य ,  जवळून अलिशान गाडीतून जाणारा माणूस थांबला . " काय ग मुलींनो , काय काम आहे तुमच? परत आमच्या बिल्डींग मध्ये यायचं नाही." त्याच्या ओरडण्याने घाबरलेल्या मुली एकमेकीना बिलगून उभ्या राहिल्या मोळी तिथेच  टाकून माघारी फिरल्या . अलिशान गाडीतल्या माणसाला काही थांबायला वेळ नव्हता तो लगेच निघून गेला . त्याला पुरेसा लांब गेलेला बघून दोघी पुन्हा आत आल्या आणि टाकून दिलेल्या आपल्या मो

मन....

 मनाचा थांगपत्ता लागलायका कुणाला? आपल्या मनात असंख्य गोष्टी चाललेल्या असतात समोरच्याला त्याची चाहूल सुधा लागत नाही . समोर आनंदी दिसणारा व्यक्ती मनात कित्येक वेदना घेऊन जगत असतो .आणि त्या वेदनांसह समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती समोर आपला हसरा चेहरा दाखवत असतो . कोणालाच कोनाविषयी  काही समजत नाही अगदी बेस्ट फ्रेंड म्हणवला तरी त्याला आपल्या जिवलग मित्राच्या/मैत्रिणीच्या मनात काय चालले आहे हे समजत नाही . एकांतात मन हव्या त्या दिशेला भरारी घेत असत. आयुष्य म्हणजे काय हे कोड उलगडण्याच्या प्रयत्नात असते. बुद्धी, हदय, आणि संवेदना याची सांगड घालून योग्य त्या दिशेने प्रवास करणे अतिशय गरजेचे आहे .मन  आणि मनानेच स्वीकारलेली ती दिशा अतिशय वैविध्यपूर्ण सृष्टीने नटलेली असते . त्यात रममाण होताना स्वातंत्र आणि स्वैराचार  या भेदाची जाणीव असणे गरजेचेच  आहे .शेवटी मनाचेच मनोराज्य ते कुठे कुठे आणि कसे कसे भटकून येतील सांगता येत नाही. आयुष्याचे स्वरूप समजणारे क्षण प्रत्येकाला समजतातच असे नाही पण ज्याला समजते तो आपल्या मेंदूच्या आराखड्यात बसेल असा  योग्य मार्ग निवडून त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो . आ

विवाहाची नैतिक , सामाजिक बंधने

विवाहसंस्थेला   आज  हादरे  बसत  आहेत शतकानुशतके  चालत  आलेल्या  विवाहाची  नैतिक , सामाजिक  बंधने  हि  स्त्री  आणि  पुरुष दोघानाही  जाचक   बनवत आहेत .एक तर टीव्ही च्या आणि सहज सुलभ उपलब्ध असलेल्या नेटची कृपा म्हणा की काहीअजून म्हणा पण आजकाल नैतिकतेचे बंधन झुगारून टाकण्यास पिढी किती सरसावली आहे हे सांगायची गरज नाही . फेसबुक त्वितर सारख्या सोशल साईटचा उपयोग आपल्या प्रगती पुरता मर्यादित ठेवला तरच उत्तम . पण ते तसे घडत नाही सहज केले जाणारे चाटींग, आणि त्या चाटींग मधून एखाद्या भावूक व्यक्तीच्या भावनेला हात घातला तर नैतिकता धासालायला वेळ लागत नाही .सोशल साईट मधून झालेल्या ओळखी. आणि त्यातून प्रत्यक्ष घेतल्या जाणार्या भेटी ह्याचे प्रमाण सरस वाढलेले आहे. . स्त्रिया घरकाम नोकरी आणि वृद्धांची देखभाल या तिहेरी बोज्याखाली पिचत आहेत त्यातून त्यांनी शोधलेला विरंगुळा हा त्यांच्या आयुष्यात घातक तर ठरू शकणार नाही ना याचा विचार केला पाहिजे. आपल्या पार्टनरविषयी संशयाच्या धुक्याने माणूस वेढला आहे घटस्फोटांचे   प्रमाण  वाढत  आहे केवल लग्न संस्थेला योग्य असा पर्याय उपलब्ध नाही म्हणूनच लग्नसंस्

'निस्तब्ध '

तू तसाच स्तब्ध उभा राहा  माझी वाट बघत  क्षितिजाच्या त्या अंताशी  मी तुला भेटेल  बघ मग निर्माण होईल एक सुरे ल सं गीत  आपल्यातल्या एका नव्या नात् या सह  नव्या संगीतात हरवून जायला  मी नक्की येईल तू तसाच स्तब्ध उभा राहा  माझी वाट बघत  आपले प्राण एकवटून  आणि आठव त्या गीत्तांना  ज्यांनी साथ दिली तुझ्या एक ांता त  मी नक्की येईल तू तसाच स्तब्ध उभा राहा 'निर्विकार ' 'निस्तब्ध '... अनघा हिरे 

पक्षी कमी होत चालले आहे

इमेज
गुजरात मधील सानंद -नलसरोवर येथील पक्षी अभयारण्य परिसरातून बेचाळीस किलोमीटरचा मार्ग काढण्यासाठी सात हजार झाडांची कत्तल करण्यात आली आहे   . पाणी समस्येमुळे राजस्थानमधील केओलादेवी राष्ट्रीय उद्यान अर्थात भरतपूर पक्षी अभयारण्य उजाड होत   आहे  . भोपाल  , मैनीत  परिसरात गवत साफ करण्यासाठी लावल्या  गेलेल्या आगीत प्रवासी पक्षी आणि त्यांचे घरटे जळून खाक झाले   आहे   . फटाक्यांच्या धुरामुळे गुदमरून पडलेल्या पक्ष्यांना पशूप्रेमींनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यात कबुतरे ,  चिमण्या यांचा समावेश आहे. त्यांना उडताही येत नाही. फटाक्यांच्या आवाजांमुळे घाबरलेले हे पक्षी उडणेही विसरून गेले आहेत. ह्या आणि ह्या    सारख्या कितेक बातम्या आपल्याला हेच सागतायेत आता   पक्षी कमी होत चालले आहे . पक्षी संपत चालले आहे .याला    सर्वस्वी   जबाबदार मनुष्य आणि फक्त मनुष्यच. २५ -३० वर्षान पूर्वी चिमण्या , साळुंक्या ,पोपट यांचे थवेच्या थवे दिसायचे. आज जरी नवनवीन छोटे छोटे पक्षी बघायला मिळत असले तरी तेव्हाचे गोष्टीतले  मुलांचे लाडके चिऊ काऊ बघायला मिळत नाहीये   एवढय़ा प्रचंड प्रमाणात त्यांची संख्य

होळी ...समथिंग डिफरंट .

हाय फ्रेंड्स , होळी जवळ आली . होळी करा लहान आणि पोळी करा दान किंवा प्रदूषण होतंय एव्हडी झाडांची कत्तल कशाला करावी? वैगरे... वैगरे... हे सल्ले नाही देणार आहे मी! म्हणजे वर सांगितलेले सर्व वागलच पाहिजे त्यात काही वाद नाही पण कंटाळा नाही का आला नेहमी नेहमी तेच तेच उपदेशाचे डोस पिऊन . आही मोठे झाले आहोत! आणि शहाणे देखील ...  आता काय एव्हड देखील आम्हाला समजत नाही अस नाही की राव.. आम्हाला समजत आणि करून देखील दाखवणार पण सारख सारख तेच तेच टुमण नका लावू यार! काय ते वेगळ सांगा... वेगळ बोला... वेगळ्या गप्पा मारा . समथिंग डिफरंट ..  समथिंग डिफरंट ...   समथिंग डिफरंट म्हणता म्हणता काहीच    डिफरंट   होत नाही. तेच तेच  एकतर कॉमन होळी करा नाहीतर होळी लहान करा ..किंवा दृष्टप्रवृत्तींच्या प्रतीकांचे दहन करा .. पण काय घडणारआहे का काही    समथिंग डिफरंट  ? वर्षानु वर्ष दृष्टप्रवृत्तीच्या प्रतीकांचे दहन करायचे होळीच्या(च) दिवशी आणि नंतर परत येरे माझ्या मागल्या आहेच ना... का  ? काय झाले? मनाला लागले माझे वाक्य ? ओह  ! आय एम सॉरी... सॉरी ... मला अस काही म्हणायचं नव्हत ... अस मी अजिबात म्हणणार नाह

निवडणूक आणि उमेदवारांमधल्या गमती जमती

निवडणुकीचे दिवस सुरु झाले तसे   वॉर्ड   वॉर्ड चकचकीतदिसायला सुरवात झाली. अचानक नगरसेविका बाईनी पाच वर्ष न केलेली कामे बाहेर आली आणि मतदानाच्या केवळ एक महिना आधीच रस्त्याने पिव्हीलेज ब्लोग लावण्याचे काम रात्रन दिवसाच्या मेहनतीने केवळ दोन दिवसात संपवले नदी किनार्याची  सुरक्षा भिंत बांधण्यात आली. पण याला काही अर्थ उरला नाही आणि आता ह्या कामाची किंमत शून्य झाली. कारण निवडणुकीला उभ्या असणार्या निम्याहून अधिक उमेदवारांनी ही असल्याच स्वरुपाची कामे सोसायटी सोसायटीत चालू केलेली आहे .कुणी    वॉल    कमपाउंड करून देतोय ,कुणी नावाचे फलक लावताय कुणी ड्रेनेजची कामे करतोय . जो तो आपापल्या खिशातले पैसे खर्च  करून अचानक लोकांना सेवा पुरवायला लागला आहे . पण लोक काय  अडाणी आहेत का? त्यांना काहीच समजत नाही का? आज स्वतःच्या पैश्याने खर्च करणार नंतर हाच पैसा कुठून वसूल करणार आहे . सर्वाना सर्व काही माहित आहे..  ह्या  सर्व बाबतीत हसू , टिंगल , आणि मजेचेच किस्से जिकडे तिकडे ऐकायला मिळतात आता ही मजा मी एकटीनेच माझ्या जवळ ठेवायची जरा अन्यायच आहे ना! म्हणून म्हटलं चला सर्वांचे ही मनोरंजन करावे.  आमच्या   एका

शिक्षक आणि जनगणना

भर दुपारी धापा टाकत एक बाई आल्या हातात कागदाचा भला मोठा गठ्ठा आणि एका हातात छोटा laptop आम्हाला आमची माहिती विचारत होत्या .प्रथम दर्शनी आम्हाला त्या कुणीतरी प्रचाराला आलेल्याच वाटल्या पण जेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही  जनगण नेसाठी आलो त्यांच्या साठी आमच्या घराचे दरवाजे उघडले गेले .  इंग्रज भारत सोडून गेले . पण त्यांनी पाडलेल्या  काही पद्धती अजूनही चालू आहे.इंग्रजांच्या काळात  जनगणना करणे हे काम तेव्हा शाळेतल्या शिक्षकाला दिलेले असायचे कारण शिक्षक हा जास्त शिकलेला आणि योग्य रित्या कामाला न्याय देणारा असा होता. पण म्हणून काय भारत सरकारने पण तीच परंपरा पुढे  चालवली  पाहिजे का?   दुपारी  किंवा संध्याकाळी एक शिक्षित व्यक्ती दारोदार फिरून लोकांकडे माहिती मिळवतोय आणि कधी कधी तर त्या घरातली व्यक्ती भेटू शकली नाही तर त्यांना परत दोन तीन चकरा मारून काम पूर्ण करावे लागते. काही शिक्षिकांना तर घरात लहान मुल ठेवून फिरावे लागते कुठे कुठे तर त्यांना  अपमानास्पद वागणूक सुद्धा लोकांकडूनच  दिली जाते. हे मनाला पटतच नाही.    हे काम शिक्षकानेच करावे का?    .  भारतात खूप सुशिक्षित  बेरोजगार  आहेत . ते सध

आई सगळीकडेच आहे

गेल्या आठवड्यापासून कोकणातला दोरा चालू होता . दोन महिन्यांपूर्वी  सुद्धा मी कोकणातच होतेआणि अचानक बाबांचा फोन आला  की तुम्ही ताबडतोब  निघून याआईला बरे नाही. मालवणपासून नासिकला पोहचायला  मला जरा उशीरच झाला आई आम्हाला कायमचे सोडून निघून गेली होती.दोन महिन्या नंतर मी परत कोकणात आले व रस्त्याने जसजशी गाडी पुढे जात होती तसतश्या रिव्हर्स मध्ये माझ्या स्मृती जात होत्या. मनात एक शंका आली आपण कोकणात होतो कदाचित आई आपल्याला शोधायला कोकणात तर आली नसेल  ना? आणि माझ मन कोकणच्या रस्त्याने भटकू लागल . आईला मी कुठे शोधू, माझी आई मला कुठे सापडेल याचाच विचार करत मी रस्त्याने फिरले. त्याच दिवशी  मी खूप आजारी पडले . आता आपली कोकण ट्रीप वाया जाणार आपल्याला आई सापडणार नाही .  आम्ही जिथे राहत होतो तिथल्या काकूंनी माझी खूप सेवा केली .त्यांनी मला काय हव नको सर्वच बघितलं. आजारपणामुळे  मला झोपूनच राहावे लागायचे बाहेर पडणेही शक्य नव्हते . तसेच  काही दिवसात मला नासिकला परतावे लागले. जड अंतकरणाने मी नासिकला आले . आई भेटलीच नाही याचे दुखः मनात होतेच आणि अचानक जाणवले अरे आई तर मला भेटली होती त्या कोकणातल्या काळजी

सण आनंद घेऊनच आला पाहिजे

नव वर्षानंतरचा  पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत सण जवळ आला की नेहेमी आनंददाई वाटणारी गोष्ट म्हणजे छान गर्दी आणि रंगाने बहरलेली बाजारपेठ . तिळगुळ ,मिठाई विविध रंगी पतंग , मांजा फिरक्या आणि त्या खरेदी करणाऱ्या ग्राहकांची गर्दी. खास  सुरत, बरेली, मुंबई वरून सर्व गावा  गावांना मांजा फिरक्या दाखल झाले आहेत.  गतवर्षापर्यंत बरेली मांज्याला प्रचंड मागणी असायची. मात्र, यंदा ही जागा नायलॉन मांज्याने घेतली आहे. नोएडा, दिल्ली, पंजाब, बंगलोर या शहरांतून हा मांजा येतो. मोनोफिल, मोनोकाईट, मोनो गोल्ड, आयबीके, रॅम्बो, चक दे, ड्रॅगन यांसारख्या विविध प्रकारांतील नायलॉन मांजा 80 ते 350 रुपये प्रती रिळ या भावात उपलब्ध आहे. याशिवाय बरेली, पांडा, कुरैशी, स्पेशल मैदानी, टिपू सुलतान, फय्याज बेग यासारख्या विविध प्रकारातील मांजा उपलब्ध आहे.  तिळगुळा  साठी तिळाचे ढिगारे बाजारातील अजून एक छान आकर्षण, आणि त्या तिळाच्या  धीगार्याना  सजवायला रंगीत फुलांची आरास वा! बघितल्या बरोबर त्याचे आकर्षण वाटणार नाही असा व्यक्ती  क्वचितच बघायला मिळत  असेल . हल्ली साखरेच्या हलव्याचेही बरेच वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. मह

असुरक्षित

इमेज
     नासिक मध्ये सगळीकडेच सध्या भयावह गोष्टी घडण्याचे जणू सत्रच चालू आहे . अतिशय लाजिरवाणी आणि प्रत्येक आईबापाला चिंतेत टाकणाऱ्या अश्याच घटना  आहे . तरुण मुलीवर सामुहिक बलात्कार तसेच  चवदा वर्षाच्या मुलीवर बलात्कार होणे  आणि नंतर तिला जीवे मारून टाकणे .. ह्या घटना  घडून काही दिवसही नाही उलटत की लगेच त्याच प्रकारची घटना घडते  आणि वारंवार अश्या स्वरूपाच्या घटना घडतंच जातायेत. पोलीस यंत्रणाचा वचक कमी झालाय किंवा दादा, आण्णांच्या राजकारणातील चमचे कार्यकर्ते उगाच आपल्या हातात पॉवर आलीय आणि आपले कुणीही काहीही बिघडवू शकणार नाही ह्या भ्रमात  वावरताय की काय कोण जाणे .गुन्हेगारांना पोलिसांचा धाक बसलेला नाही आणि कमी शिक्षित अडाणी अंगठा छाप नेते , तडीपार गुंड यांची सत्ता वाढत चाललीय एकंदरीत नासिकला तरी असे चित्र  उभे राहिले आहे अस वाटायला लागलेय. विषय फार मोठा आहे चवदा वर्षांच्या मुलींवर बलात्कार करण्याची ताकद निर्माण झालीय आणि तीही चवदा पंधरा वर्षाच्या मुलांमध्येच म्हणजे एकदम अजाण वय .ह्या  अजाण वयात चांगल्या वाईटाची समज नाही .. घरात कोणाचे लक्ष नाही . आई वडील कामा निमित्ताने  दिवस भर घरा