होळी ...समथिंग डिफरंट .

हाय फ्रेंड्स ,
होळी जवळ आली . होळी करा लहान आणि पोळी करा दान किंवा प्रदूषण होतंय एव्हडी झाडांची कत्तल कशाला करावी? वैगरे... वैगरे... हे सल्ले नाही देणार आहे मी! म्हणजे वर सांगितलेले सर्व वागलच पाहिजे त्यात काही वाद नाही पण कंटाळा नाही का आला नेहमी नेहमी तेच तेच उपदेशाचे डोस पिऊन .
आही मोठे झाले आहोत! आणि शहाणे देखील ...
 आता काय एव्हड देखील आम्हाला समजत नाही अस नाही की राव.. आम्हाला समजत आणि करून देखील दाखवणार पण सारख सारख तेच तेच टुमण नका लावू यार! काय ते वेगळ सांगा... वेगळ बोला... वेगळ्या गप्पा मारा . समथिंग डिफरंट ..
 समथिंग डिफरंट ... समथिंग डिफरंट म्हणता म्हणता काहीच  डिफरंट  होत नाही. तेच तेच  एकतर कॉमन होळी करा नाहीतर होळी लहान करा ..किंवा दृष्टप्रवृत्तींच्या प्रतीकांचे दहन करा .. पण काय घडणारआहे का काही  समथिंग डिफरंट ? वर्षानु वर्ष दृष्टप्रवृत्तीच्या प्रतीकांचे दहन करायचे होळीच्या(च) दिवशी आणि नंतर परत येरे माझ्या मागल्या आहेच ना...
का  ? काय झाले? मनाला लागले माझे वाक्य ?
ओह  ! आय एम सॉरी... सॉरी ... मला अस काही म्हणायचं नव्हत ... अस मी अजिबात म्हणणार नाही कारण मला हेच म्हणायचे आहे . दृष्ट प्रवृत्तीच्या प्रतीकांचे दहन करावे ते आपणआणि दृष्ट प्रवृत्तीचे दहन करावे ते आपल्या शेजारच्याने... आपण नाही ..
असच असत ना? भ्रष्टाचाराचे दहन करा पण ते दुसर्याने मी नाही.. कारण मी मतदानापासून ते माझे छोट्यात छोटे काम देखील सोईस्कर रित्या होण्यासाठी किंचितसा का होईना माझ्या तत्वाला मुरड घालणार ... मग मी कसे काय ह्या दहनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार!!! 
जाऊ द्या  त्या दृष्टप्रवृत्ती दहन करण्याची आयडिया फ्लॉप... सपशेल फ्लॉप ह्म्म्म .... जे मनातच नाही ते विनाकारण दिखाव्यासाठी का कराव बर आपण ... बरोबर आहे ना? 
जाऊ द्या जाळूया चार लाकड ईतर जाळतात त्यात आपण अजून जाळले तर काय फरक पडणार आहे आणि एक छोटीशी का होईना पोळी आपण नेवेद्याला अग्नीत जाळूच.. लोकांना अन्न मिळत नाही भूक मारी आहे.. आहो!  पण ते फक्त पेपर मधेच वाचतो की आम्ही .. नेट वर जशे हडकुळे मुलांचे चित्र दिसते तशे मुल आपल्याला सिग्नल वर पण बघायला नाही मिळत त्याच काय? .. मग काय करणार परंपराच चालत आलीय ती कशाला मोडायची आणि सुरवात तर कुणी तरी करायला हवी ना की आपणच पळत सुटायचं... हा आता सगळीकडे गाजावाजा होतोच आहे तर करूया एखादी पोळी पण दान त्यात आपल्याला काय विशेष फरक पडणार आहे... हो की नाही ... मग तर झाल... झाले  ना ...खुश... 
आज तुम्ही  म्हणाल आम्हालाच सांगत बसलीय बया पण बघा काही दिवसांनी पेपर मध्ये कसे फोटो छापून येतील अमक्या तमक्या दादा भाऊंच्या होळीच्या कार्यक्रमाचे होळी पोळीचे राजकारण बघा कसे पेपरांमध्ये झळकतील ... 
आहो ! पण मी म्हणते जाऊ द्या बिचार्यांना होळी होळी खेळायला आवडतेच मतदानाच्या वेळी नाही का त्यांनी करोडो रुपयांची होळी खेळली होती... आणि मधून मधून नाही का कसल्या कसल्या होळ्या खेळतात हे... खेळातले पटाईत लोक ते ... जाऊ द्या हो  खेळू द्या की... आपल्या काय ( बीप..बीप ) चे जाते   ह्या होळीच्या राजकारनाकडेही सवई प्रमाणे करा की दुर्लक्ष. आपल्याला काय ते अवघड आहे?
किती पण चुकीच्या गोष्टीवर बोलायला लावता मला ... अहो होळीचा सन आहे मजा करा राव , रंगांची उधळण करा कुठ कुठल्या रंगात रंगून जा.
प्रेमाच्या रंगात रंगा , लफड्याच्या रंगात रंगा, राजकारणाच्या रंगात रंगा . काहीही कारण काढून कुठल्याही करणात कारण शोधून रंगा ... रंगात रंगा ... अरे रंगा रे ! 
मज्जाच करायचीय ना रंगात रंगून .फक्त रंगात रंगताना तोंडाला काळ फासून घेऊ नका म्हणजे झाल .. 
मग  करा मजा होळीची , रंगांची आणि स्वतःच्या जीवाची सुद्धा. 
अनघा हिरे 
नाशिक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी