विवाहाची नैतिक , सामाजिक बंधने

विवाहसंस्थेला   आज  हादरे  बसत  आहेत शतकानुशतके  चालत  आलेल्या 
विवाहाची  नैतिक , सामाजिक  बंधने  हि  स्त्री  आणि  पुरुष दोघानाही  जाचक  
बनवत आहेत .एक तर टीव्ही च्या आणि सहज सुलभ उपलब्ध असलेल्या नेटची कृपा म्हणा की काहीअजून म्हणा पण आजकाल नैतिकतेचे बंधन झुगारून टाकण्यास पिढी किती सरसावली आहे हे सांगायची गरज नाही . फेसबुक त्वितर सारख्या सोशल साईटचा उपयोग आपल्या प्रगती पुरता मर्यादित ठेवला तरच उत्तम . पण ते तसे घडत नाही सहज केले जाणारे चाटींग, आणि त्या चाटींग मधून एखाद्या भावूक व्यक्तीच्या भावनेला हात घातला तर नैतिकता धासालायला वेळ लागत नाही .सोशल साईट मधून झालेल्या ओळखी. आणि त्यातून प्रत्यक्ष घेतल्या जाणार्या भेटी ह्याचे प्रमाण सरस वाढलेले आहे. . स्त्रिया घरकाम नोकरी आणि वृद्धांची देखभाल या तिहेरी बोज्याखाली पिचत आहेत त्यातून त्यांनी शोधलेला विरंगुळा हा त्यांच्या आयुष्यात घातक तर ठरू शकणार नाही ना याचा विचार केला पाहिजे. आपल्या पार्टनरविषयी संशयाच्या धुक्याने माणूस वेढला आहे घटस्फोटांचे   प्रमाण  वाढत  आहे केवल लग्न संस्थेला योग्य असा पर्याय उपलब्ध नाही म्हणूनच लग्नसंस्था अद्याप टिकून आहे  अशा  परिस्थितीत   हि मोडकळीस  आलेली विवाह  संस्था  नामशेष  करून  नवीन  समाज  रचना  जी  स्त्री आणि पुरुष दोघानाही   सुखकर  आणि आनंददायी  ठरेल  अशी  उभारण्याचे  जर  ठरविले  तर त्याचे   स्वरूप  कसे  असेल ?हे विचार खरच गोंधाल उडवणारे आहेत.
फोरेन कल्चरचे अंधानुकरण लिव्ह अंड रिलेशन शिप ..लग्नसंस्था  नको   ह्याचाच  अर्थ नितीमत्ता   किवा  चारित्र्य सांभाळण्याचा  धाक  किवा गरज  नाही   जी आतापर्यंत  बहुधा  स्त्रियांचीच मक्तेदारी  होती.म्हणजे  निष्ठा नाही म्हणजे  स्वैराचार या शब्दालाही काहीच अर्थ राहणार नाही. लिव्ह अंड रिलेशन शिप किव्हा कॉनट्राक्ट म्यारेज यात विवाहाचे जरी तोटे टाळता येत असले तरी फायदेहे थोड्याच प्रमाणात घेता येतात. म्हणजे पातळ तर एकत्र राहा अन्यथा वेगळे व्हा.. ना घटस्फोटाची झान्जात ना ईतर कायद्याचे बंधन. पण या दोनही पर्यायी विवाह संस्थेचे तोटे हे स्त्रियांनाच भोगावे लागणार. एकतर स्त्रिया मुळातच हळव्या मनाच्या त्यात परत वेगळे झाल्यावर मनाचे झालेले खच्चीकरण आणि शिवाय समाजाच्या अलिखित कायद्यांना झुगारून पुढे टाकलेले पूल .त्याला समाजाकडून उघड उघड प्रतिसाद तो मिळणारच नाही.. आणि मिळाला तरी पुन्हा त्याच जाळ्यात गुरफटून जाण्याची भीती नाकारता येत नाहीच.
अश्मयुगात माणूस टोळ्या करून राहत होता. प्रत्येक जण आपल्याला जो आवडेल तो पार्टनर निवडत होता.. अनेक जण अनेक जणांशी संभोग करण्यास मोकळा होता.. आताच्या ह्या सुध्रालेल्या मानव जातीने पुन्हा मागासलेल्या माणसांची अवस्था स्वीकारायला सुरवात केलीय.याचा अर्थ आपण पुन्हा अश्म युगात जाणार तर .
कॉनट्राक्ट म्यारेज हा करार अनिश्चित स्वरूपाचा किवा ठराविक काळासाठी असणार ह्या ठराविक काळासाठी तरी एकमेकाशी प्रामाणिक राहणे गरजेचे असेल का  हा हि एक प्रश्नच आहे मग मुलांचे काय ?जर मुले झाली आणि फारकत झाली तर त्यांना कोण पाहणार हे कदाचित करारानुसार ठरविता येईल . मुलांच्या सुरक्षिततेचे काय? त्याचा विचार करायलाच नको का? असे ही लाखात एखाद जोडप अस असत की जे एकमेकांवर जिवापार प्रेम करत असत .पण प्रत्यक्षात अनेक जोडपे हे एकमेकांना कडी ना कडी कंटाळलेली असतात . आपली विवाह संस्था किमान पटत नसणार्यांना एकत्र बधून ठेवते. एकत्र राहून सहवासातून सवई, विचार बदलून एकमेकांची साठ-सोबत करत सगळे एकत्र राहतात तरी शिवाय महत्वाच म्हणजे ह्या विवाह संथेत मुल सर्वात जास्त सुरक्षित असतात. त्यांचा भावनिक विकास सुयोग्य पद्धतीने होतो जर स्त्री पुरुष संबंधच 
टिकावू नसतील तर लग्न संस्थेत जो नात्यांचा गोफ विणला जातो आणि ज्याचा भावनिक आधार प्रत्यक व्यक्तीला मिळतो तो नाहीस होईल काका  मामा आत्या मावशी
हि सारी नातीआणि अर्थातच आई आणि वडील दोघेही  लहान मुलासाठी फार आवश्यकअसतात हि नाती त्यांना प्रेम आणि आपलेपणाची भावना देतात   पुन्हा आपल्यला जी व्यक्ती जोडीदार म्हणून आवडली असेल तिला आपण आवडूच ह्याची काय खात्रीकाय शिवाय दुसरा जोडीदार जरी शोधला आणि तो पहिल्या जोडीदारापेक्षा अधिक त्रासदायक निघाला तर कुठल्याही दोन सज्ञान व्यक्तीचे विचार १००% कधीच जमणार नाहीत मग असे किती जोडीदार आपण बदलणार ?कुठतरी तडजोड हि आलीच जशी ती सर्व नात्यात असते
द्यावी लग्नाच्या बायकोला आणि मुलांना समाजात    कायद्याने काही अधिकार असतात जे अशा नात्यामध्ये मिळतीलच असे नाही जर आपल्या जोडीदारावर मोठे आजारपण किवा अपंगत्व आले तर त्याला सोडून दुसरा जोडीदार गाठणे अतिशय सुलभ होईल तरुणपण कसेही जाईल पण वृद्धापकाळी  जोडीदार मिळणे मुश्कील होईल वृद्धापकाळातील दुखणी बाणी
हि कुटुंबाच्या आधारानेच सहन केली जातात प्रत्येक स्त्री आणि पुरुषालाआर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असावे तर लागेलच पण स्वताचे स्वतंत्र घर असणे हि सुद्धा एक आवश्यक बाब ठरेल कारण कधी कुठले नाते तुटेल हे सांगता येणार नाही .जुने नाते तोडून नवीन नाते जोडणे हे कायद्याच्या दृष्टीने सोपे झाले तरी  भावनिक दृष्ट्या होणारी मोडतोड काही टाळता येणार नाही लग्न संस्था काय  किवा करार लग्न काय  टिकण्यसाठी कायद्यची मदत जरी मिळत असली तरी सर्वच गोष्टी करार किवा कायदा करून अमलात आणता येत नाहीत दोन्ही पक्षी थोडे प्रेम थोडा समजूतदारपणा थोडा स्वार्थत्याग आणि समर्पण व जबाबदारीची भावना  ह्या भावना कोणतेही नाते यशस्वी होण्यसाठी आवश्यक असतात यासाठी लग्नसंस्थे मध्येच
थोडासा बदलाव आणला तर ते जास्त चांगले होईल जर पुरुषप्रधानता कमी झाली स्त्रियांवरील पुरुषांचे वर्चस्व कमी झाले स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये समानता  आली  आणि लग्नबंधनात जरूर तिथे लवचिकता आली योग्य कारणासाठी घटस्फोट सुलभ झाले तर तो एक सुखी आयुष्यासाठी  योग्य मार्ग ठरू शकेल
अनघा हिरे
नासिक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी