पक्षी कमी होत चालले आहे

गुजरात मधील सानंद -नलसरोवर येथील पक्षी अभयारण्य परिसरातून बेचाळीस किलोमीटरचा मार्ग काढण्यासाठी सात हजार झाडांची कत्तल करण्यात आली आहे .
पाणी समस्येमुळे राजस्थानमधील केओलादेवी राष्ट्रीय उद्यान अर्थात भरतपूर पक्षी अभयारण्य उजाड होत आहे .
भोपाल , मैनीत परिसरात गवत साफ करण्यासाठी लावल्या  गेलेल्या आगीत प्रवासी पक्षी आणि त्यांचे घरटे जळून खाक झाले आहे .
फटाक्यांच्या धुरामुळे गुदमरून पडलेल्या पक्ष्यांना पशूप्रेमींनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यात कबुतरेचिमण्या यांचा समावेश आहे. त्यांना उडताही येत नाही. फटाक्यांच्या आवाजांमुळे घाबरलेले हे पक्षी उडणेही विसरून गेले आहेत.
ह्या आणि ह्या  सारख्या कितेक बातम्या आपल्याला हेच सागतायेत आता पक्षी कमी होत चालले आहे . पक्षी संपत चालले आहे .याला  सर्वस्वी जबाबदार मनुष्य आणि फक्त मनुष्यच.

२५ -३० वर्षान पूर्वी चिमण्या , साळुंक्या ,पोपट यांचे थवेच्या थवे दिसायचे. आज जरी नवनवीन छोटे छोटे पक्षी बघायला मिळत असले तरी तेव्हाचे गोष्टीतले  मुलांचे लाडके चिऊ काऊ बघायला मिळत नाहीये  एवढय़ा प्रचंड प्रमाणात त्यांची संख्या कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे.
पक्षी निरीक्षण आणि दर्शनासाठी निघालेल्या शोकीनांनी आणि  आपल्याला त्या बाबतीत तज्ञ म्हणवणाऱ्या लोकांकडून पक्षी निरीक्षणा बाबतचे  साधे नियम पाळले जाऊ नये या सारखे दुर्भाग्य नाही.. फोटो काढायच्या नादात  आपण काय चुका करतोय ते तथाकथित तज्ञांना समजलेच पाहिजे. पक्षी ही निसर्गाची देण आहे आणि त्याचे सौंदर्य यावर सर्वांचाच अधिकार आहे. फक्त आपण पक्षी तज्ञ आहोत म्हणून आपलीच यावर  मक्तेदारी आहे हे तर  चुकीचे तत्व आहे. जर तुम्ही स्वताला पक्षी तज्ञ म्हणवता तर त्यांचे फोटो काढून  स्वताला प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास कशाला हवा. वन खात्यानेही तुटपुंज्या पैश्याचा  हव्यास सोडला पाहिजे . किरकोळ तिकीट दर लावून सर्रास लोकांना पिकनिकला जागा उपलब्ध करून दिली जातेय . मागे आम्ही शाळेच्या ट्रीप बरोबर पक्षी उद्यानात गेलो आश्चर्याची गोष्ट  अशी होती आमच्या लहान मुलांना जे समजत होते ते तिथे  खाण्यापिण्यासाठी सहल करायला आलेल्यांना अजिबात समजत नव्हते .. कुठे चूल मांडून  स्वयपाक चालू होता . धुराचा भला मोठा लोटवर पर्यंत उठलेला होता.. कुणी क्रिकेट खेळत बसलेले.. जागोजागी प्लास्टिकच्या पिशव्या पडलेल्या . सोफ्ट ड्रिंकच्या रिकाम्या बाटल्या, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या . सगळी कडे  गोंगाट कलकल चालू होता . अतिशय संतापदाई वातावरण होते ते. आम्ही पुढे पुढे जात होतो  एक एक दृश्य बघून मन कासावीस झाले. पक्षी दिसावे म्हणून आम्ही संथ पावलाने एकही शब्द न उच्चारता पुढे पुढे जात होतो पक्षी तर बघायला मिळाले नाही पण वनविभागाचा भोंगळा कारभार मात्र बघायला मिळाला. वन खात्याचे सारे नियम पायदळी तुडवून त्यांना पक्षीदर्शन घडवणारे यांच्यावर पायबंद घालण्याची गरज कुणालाही वाटत नाही,
पक्षी तज्ञांना (?) ( स्वताला तज्ञ म्हणवनार्यांना) अभ्यासाची परवानगी कुणी दिली आहे ज्या साठी ते सर्रास पक्षांची अंडी पिल्ली हाताळतात. त्यांच्याकडून अंडी फुटली तरी त्यांना बोलणारे कोणीच नाही. आणि त्या मुळेच फक्त प्रसिद्धीच्या हव्यास पोटी त्यांच्याकडूनच पक्ष्यांची कत्तल होतेय .हा आपल्या देशात चाललेला अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे आणि याला पायबंद घालण्याची गरज कुणालाही वाटत नाहीहे त्यापेक्षाही दुर्दैवी. 
आजूबाजूला असणार्या पक्षांमध्येही  किती पक्षी सुरक्षित आहे.  फळझाडांवर बसून  सुद्धा पक्ष्यांचे मृतू वाढत आहे.का? विषारी द्रव्य फवारलेली फळे .हो ही पण एक मोठी समस्या निर्माण होतेय .यात शेतकर्याचीच चूक म्हणता येणार नाही कारण तोच बिचारा हालात जगत आहे. त्याच्या जागी तो बरोबरच आहे. .शेतीला मिळणारा कमी भाव.शेतकर्याची होणारी हाल ह्यामुळे एका नव्या  समस्येला  तोड द्यावे लागत आहे .कमी खर्चात अधिक पिक मिळवण्याच्या मोहापाई शेतकरी फळझाडे पिके यावर विषारी द्रव्य फवारतात .मग नेमक चुकत कोण आणि कुठे ? हे सांगायची आता खरच गरज उरलीय का? 
जुन्या घरांच्या वळचणी  आणि झाडांची ढोली ही  पक्ष्यांची  घरे  होती आता त्यांचे घरच नष्ट झालेय त्यामुळे त्यांची अंडी ही सुरक्षित राहत नाही . पर्यावरणातील, अन्नासाखळीतील, परिसंस्थेतील प्रत्येक घटक  महत्त्वाचा आहे. परंतु प्रत्येक घटकाचे संरक्षण व संवर्धन केले तरच उपयोग होईल. पक्ष्यांची निवासस्थाने वाचवायला पाहिजेत. यासाठी जुन्या  झाडांचे रक्षण करणे आवश्यक आहे. आज अनेक महामार्गाचे रुंदीकरण करताना जुन्या झाडांची कत्तल होत आहे.रुंदीकरणातही प्रचंड झालेल्या वृक्षतोडी  नंतर या झाडांची परत लागवड झाली पाहिजे. 
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी