1--- प्रेम हरवते कुठे


 
आपण सगळ्यांपेक्षा वेगळेच आहोत असे लग्न झाल्या नंतर प्रत्येकलाच वाटत असते .जगातील सर्वात आनंदी ,सुखी म्हणजे आपणच 
आहोत आणि  आपले  एकमेकांवर इतके प्रेम आहे तर आपल्यात कधी भांडण होणे शक्यच नाही .सगळे जग असाच विचार कर असते  . पण  वास्तवाची  जेव्हा ओळख  होते  दोघांचे खरे रूप समोर यायला लागते . कडू गोळी साखरेच्या मुलाम्यात लपेटलेली, आणि साखरेचा मुलामा हळू हळू संपतोच  जिभेवर  रेंगाळतो  तो  फक्त  कडवट पणाच  ...नाते हे असेच असतात का? दोघांमधल सामंजस्य का संपत ? ती कुठे कमी पडते ? त्याला का हे सगळ सांभाळून घेता येत नाही ....
                                    खूप कमी पुरुषांमध्ये सांभाळून घेण्याची ताकद असते. हळव्या  मनाचे  पुरुष  फार  कमी  सापडतात  . इतरांची  काळजी  घेणे  हा  गुण त्याच  पुरुषांमध्ये जास्त दिसून येतो. गमतीचा विषय म्हणजे असे पुरुष सगळ्यांचीच काळजी घेतात. त्यांना असंख्य मैत्रिणी सुद्धा असतात.
                                  निसर्गाची कमाल म्हणा किव्हा देवाची कृपा जोड्या ह्या परस्पर विरोधीच तयार झालेल्या असतात . अती काळजी करणारी  स्त्री  तिच्या  वाट्याला नेहेमी हेळसांडच  येते . नवऱ्याचे दुर्लक्ष.  प्रेमाचा अभाव,  काळजीचा अभाव एकंदर काय तर ती कायमच त्याच्या समोर दुर्लक्षित  असते  . तिची  अपेक्षा मात्र त्याच्या कडून कायम अशीच असते कि त्याने कधीतरी माझ्यासाठी काळजीचे शब्द तोंडातून  काढावे , कधीतरी काळजीचा  स्पर्श  करावा  पण कितीही प्रयत्न केले तरी तो आपला निर्विकार दगडच तिच्या समोर असतो . 
                                 मी असेही पुरुष पहिले आहेत जे घराची मुलांची बायकोची ईतकी काळजी घेत असतात कि ते आपल्या सर्व कामात तडजोड करून  काळजी घेत असतात. आणि त्यांच्या जोडीदाराच्या बाबतीत विचार केला तर त्या बायका ढम्मअसतात ...जाऊद्याना तो करतोय ना मग आपल्याला लक्ष द्यायची काय गरज मजेची गोष्ट म्हणजे असे पुरुष सगळ्यांच्या आजारपणात स्वताहून लक्ष देतात, काळजी घेतात .पण जेव्हा स्वतहा ते आजारी पडतात तेव्हा त्यांच्या पार्टनर कडून त्यांना काळजीचा हात मिळत नाही .
                              इथूनच सुरु होतात एकमेकांमध्ये वादळ ... अती काळजी करणाऱ्या जोडीदाराला वाटते कि आपला पार्टनरला हे एव्हडे समजू नये. मी जर हे सगळ करू शकतो/शकते  तर त्यांना का नाही जमत? हि समजण्याची गोष्ट आहे सांगावी का लागते? मनुष्याला आकलन करण्याची तयारीच नाही तर त्याला काय सांगणार? स्वतःहून आपला विकास केला पाहिजे आता काय शाळेत भरती केल्या सारख शिकवायला पाहिजे का? हे कॉमन डायलॉग आहेत आणि हेच डायलॉग आपल्याला वेगवेगळ्या स्वरात ऐकायला मिळतात . 
                                 अती काळजी करणारी व्यक्ती स्वताला नेहेमी सर्वगुण संपन्न समजत असते त्या व्यक्तीच्या मते मला सर्वच जमतय अश्या वेळेस समोरच्याने काही सांगितलेलं त्याला  पटत नसते. त्या व्यक्तीला आपल्या कार्यावर शंका घेतल्या सारख वाटत . त्यामुळे मला शिकवण्याची गरज नाही जे सांगितला आहे तसे तर वागता येत नाही असा वारंवार टोमणा देऊन ती व्यक्ती मोकळी होत असते. आता प्रश्न हा आहे कि नेमकी वागायचं म्हटलं तरी वागाव कस परिणामी ह्या व्यक्तीचा पार्टनर अजूनच अलिप्त राहायला लागतो नको बाबा मी  केलेलं काहीच हिला /ह्याला पटत नाही त्याच्या पेक्षा काही न केलेलं बर आणि हा / हि दुर्लक्ष करतात म्हणून हे आपले मनातल्या मनात धुसपूस  करत बसतात. तात्पर्य काळजी घेणारी व्यक्ती स्वताच्या हातात सर्व अधिकार घेऊन बसते आणि त्याच्या अधिकार क्षेत्रात पार्टनरनेकेलेली लुडबुड त्याला चालत नाही.त्याला सल्ला किव्हा मदत नको असते पण सहकार्य मात्र हवे असते.
                                 एकंदर काय तर दोघांचे मनातल्या मनात दुखन हे असतच तो असा का वागतो? आणि ती अशी का वागते?हे समजणे फार गरजेचे आहे.  अंतर्मुख होऊन विचार करून तसेच एकमेकांशी संवाद साधून अनेक प्रश्न सोडवता येऊ शकतात. पण संवादहा केवळ संवादच असला पाहिजे त्या संवादात एकमेकांच्या त्रुटीवर बोट ठेवताना खूप काळजी पूर्वक वागले पाहिजे. नाहीतर ह्याचा उलट परिणाम व्हायला पण वेळ लागणार नाही. स्वताच्या सुधारणे विषयी काहीही न बोलता   किव्हा स्वतामध्ये काहीही सुधारणा न करता जर फक्त समोरच्याच्या चुका ,दोष यांच्यावर बोलत बसलो किव्हा टोमणे मारत बसलो तर ते नात तुटायला वेळ लागणार नाही .
                             एकमेकांबद्दल कितीही प्रेम असलं तरी वागता बोलतांना या गोष्टीचे भान ठेवले नाही तर नात कोमेजायला आणि संपायला  वेळ  लागत नाही मग एकमेकांविषयी द्वेष तिरस्कार वाढतच जातो गैरसमज,अविश्वास फोफावत जातो. दडपशाहीचे प्रमाण वाढू लागते.आपल्या भारतात नाते तसे कमीच तुटतात पण सर्वात मोठ स्वीकारण्याचे सत्य म्हणजे आपल्या भारतात दोघ  एकमेकांबरोबर खूप तडजोड म्हणून किव्हा घरगुती अडचणी  मुले एकमेकांच्या नुसते  बरोबर राहत असतात .एकमेकांच्या साथ सोबत राहत नाही . हे असे नाते  कायदेशीररित्या  जरी तुटलेले नसले तरी मनाने ते फार  कधीच तुटलेले  असते. मन मारून लोकलाजेस्तव  हे एकत्र रहात असतात. काही थोड्या  लोकांनाच प्रेम अनुभवायला मिळते पण त्यातही  गडबड होणार नाही याची शाश्वती नाही.

   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी