केअर टेकर

खूप काही बोललास स्वप्नील काल तू . राग नाही आला पण दुखः झाले . तू सुद्धा समजून घेऊ शकला नाहीस. काल बोलता बोलता खूप काही बोलून गेला . म्हणजे त्या गोष्टी तू मानतोस तर ! मला वाटल आपल्या प्रेमात ह्या गोष्टीना क्षुल्लक स्थान आहे .' बाहेरख्याली पणा ' हा शब्द मनाला खूप लागला ठीक आहे तुला माझ्याबोलायाच नव्हत पण शब्द तर हाच सुचला ना तुला. प्रेम आणि प्रेमाच्या आविष्कारातून झालेली कृती बाहेरख्याली वृत्ती कशी काय असू शकते. ज्या कृतीतून मला गिळत नाही ते चूक कसे काय.?
विचार करून करून सोनालीकाचे डोक फुटायची वेळ आली होती पण तिला काही उत्तर मिळेना. अचानक पायाखालची जमीनच खेचून घेतल्यासारखे तिला भासू लागले . अन जमीन खेचणारा कॉन तर तिचा जीवलगच. जीवापाड प्रेम करतो ना आपण त्याच्यावर मग त्याच्या तोंडून हे शब्द ....
सर्व नकोस झालेलं असतांना कुठून तरी एक आशेचा किरण चामाकावा तसा त्याचा तिच्या आयुष्यातला प्रवेश मग अचानक सर काही सुखकारी घडतंय असा वाटणारा भास .. ओढ आतुरता ... हुरहूर सर्वाना बरोबर घेऊन एका क्षणाला पूर्ण पणे त्याचे होऊन जाण्याचे स्वप्न.... . भेटीची इच्छा ....व्याकुळता अन भेटी नंतर मिलनातून मिळालेली तृप्ती , सार सारकाही सुखदाईच  होत . मग आता असे अचानक काय झाले ? का सोनाला उदास वाटू लागले. 
प्रेम म्हणजे नेमक काय होत तीच ! एका पर पुरुषाच्या शरीराचे आकर्षण की त्याच्या स्पर्शाची ओढ की फक्त शरीर सुख ? छे! हे असलं काही नव्हत मग नेमक काय आणि बाहेरख्याली हा शब्द एव्हडा मनाला का बोचला तिला? तास म्हटलं तर एक प्रकारे ते सत्य तर होत नवरा असतांना पर पुरुषाच्या  प्रेमात पडलेली, चाळीशीची स्त्री होती ती .
इतके वर्ष कधीही असे घडले नाही मग ह्या वयात तिचे असे परपुरुषाच्या प्रेमात पडणे खरच नेमक काय होत प्रेम की वासना? 
शरीर सुख हे तर तिला तिच्या नवर्याकडून मिळत होते (?) म्हणजे नित्य नियमाने नवरा ते देतोच. जरी त्याच्या स्पर्शात आपले पणा नसला तरी काय झाले आणि तिच्या मनाचा त्याने विचार केलाच पाहिजे असा काही नियम नाही . जरी वासनेने तुडुंब भरलेला , गलिच्छ हालचाली आणि हावभाव करणारा तो असला म्हणून काय झाले त्याने काय फराक पाडतो स्त्रियांना ह्या बाबतीत स्वतःचे मत नाही म्हणून तिला प्रेम करण्याचा अधिकार नाही तिला तिचा मानसिक आधार शोधण्याचा अधिकार नाही. 
विचारांच्या धिक्यात जात्तांना त्याचे जीवघेण्या धुराळ्यात कधी रुपांतर झाले सोनाला समजलेच नाही .
आधार ....केअर टेकर ......
आता हे फक्त शब्दाचे बुडबुडे आहेतका? आपल्याला आधार वाटणारा व्यक्ती आपल्या आयुष्यात पहिल्यांदा का आला आला नाही जरी आला असता तो तितकाच संवेदनशील बनून आपल्या आयुष्यात राहिला असता  का?की  कालांतराने हे पण नाते बदलले असते . स्वप्नवत वाटणारे वास्तविक रुपात कसे असेल कुणालाच सांगता येत नाही 
हुश्श्शश्श्श्श ...............................

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी