त्याने मला तीन वेळा स्पर्श केला पण .....


त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा मी आयुष्याच्या सर्वात सुंदर दिवसांमध्ये जगात होते. माझे नुकतेच लग्न झाले होते .त्या सुंदर दिवसांनी माझे मन मोहरून गेले होते, मी माझ्याच आनंदात सगळ जग माझ्याच मुठीत आणि मी जगातली सर्वात आनंदी ,खुश व्यक्ती अश्या ह्या आनंदाच्या दिवसात आम्ही  हनिमून साठी माथेरान ला गेलो होतो.
  जे हव होत ते सगळ मिळत होत. माझा आवडता व्यक्ती आणि खूप वर्षांच्या प्रतीक्षे नंतर आता त्याचा सहवास सारे काही स्वप्नवत भासत होते. पण....
माथेरानचा पावसाला दूर दूर घनदाट  झाडी ,पक्षांचा आवाज ,माकडांची ची ची ,तासंतास फिरून सुधा मिळणारा एकांत हे सगळे वातावरण बघून मी जरा घाबरूनच गेले .पहिल्या दिवशीच मी माथेरानचा खूप धसका घेतला .हा एकांत ,शांतता मनाला नकोनकोशी झालेली त्यात पहिल्या दिवशीच आम्ही रात्रीचे जंगलात हरवलो सतत मुसळधार पाऊस, किर्र अंधार पायाख्ळून रस्ता जातोय कि अजून काही, काहीच समजत नव्हते.वाट फुटेल तिथे आम्ही जात होतो दूरवर कुठेतरी एखादा छोटासा लाईट दिसायचा पण थोड्या वेळाने तो पण दिसेनासा व्हायचा. कसे बसे आम्ही रेल्वे चे रूळ शोधून काढले आणि आमचे  mtdc  चे  हॉटेल शोधून काढले. ती रात्र मी खूप भीतीत घालवली .सकाळी सकाळी मी अतुल च्या (माझ्या नवऱ्याच्या)मागे लागली कि मला इथे राहायचेच नाही चला आपण नासिकला परत जाऊ .पण अतुल ला माझे काहीच ऐकायचे नव्हते.मग आपण किमान मार्केट मध्ये तरी जाऊन राहू जंगलातल्या  एकांता पेक्षा  मला मार्केट मधला गजबजाट जास्त आवडला . म्हणून मार्केट मधल्या गजबजाटात आम्ही रूम घेतली .
रूम तर मार्केट मध्ये घेतली, पण माथेरानचे प्रेक्षणीय स्थळ बघण्यासाठी आम्ही बरेच लांब लांब फिरायला जायचो. एकदा असेच आम्ही फिरता फिरता  खूप लांब वर कधी पोहोचलो हे समजलेच नाही. आम्ही परत रस्ता चुकलो तासनतास चालत राहिलो ,रस्ता शोधात राहिलो पण काहीच नाही .रस्त्याने एक मनुष्य पण बघायला मिळत नव्हता.
सतत वेगवेगळ्या रस्त्याने जात होतो परत फिरून फिरून तिथेच येत होतो अचानक मला खूप लोकांचा आवाज आला ,मला खूप आनंद झाला .'अतुल चाल आपण त्या आवाजाच्या दिशेने जाऊ .'
माझी खूप घाई चालू झाली .अतुल पण माझ्या बरोबरीने येताच होते . त्या खूप सार्या लोकांना बघून मला फार आनंद झाला. इतका वेळ भटकल्या नंतर एव्हडे सारे माणस बघायला मिळताय, आम्हाला फार बरे वाटले. 
आता त्या लोकांजवळ जावे आणि त्यांना रस्ता विचारून रूम वर जावे एव्हडच ठरवले होते . आम्ही त्या लोकांजवळ जाऊ लागलो .ते लोक काहीतरी काम करत होते त्यांच्या हातात मोठे मोठे दोर कुऱ्हाडी होत्या  काही जन ते दोर झाडाला बांधून ओढत होते.  नित बघितल्यावर लाखात आले ते सगळे झाड कापत होते .आम्ही तिथेच त्यांची गमत बघत होतो थोडा वेळ आता इथेच थांबायचे.कारण खूप वेळा पासून आम्ही कोणालाच बघितलेच नव्हते. अचानक त्या लोकांच्या हातून तो दोर सटकला आणि एकच गोंगाट सुरु झाला .सगळे जन जोर जोरात आरडा ओरडा करू लागले ज्याची कोणालाच शक्यता वाटत नव्हती तेच झाले .झाडाची भल्ली मोठी जाडजूड फांदी ज्या दिशेला पाडण्या साठी त्यांनी पकडली होती त्याच्या विरुद्ध दिशेला येऊन ती पडत होती. अतुल पळत येत होते त्यांनी मला खेचतच लांब नेले आणि क्षणातच मी जिथे उभी  होती तिथे ती जाडजूड फांदी येईन पडली. 
 
माझ्या छातीत धस्स झाले काय होणार होते त्या क्षणाला? नंतर मला काहीच समजत नव्हते माझ्या अवती भवती लोक उभे होते ,सगळे जन माझ्याशी काहीतरी बोलत होते आणि माझ्या कानात कोणाचेच शब्द जात नव्हते. चार दिवसच झाले होते माझ्या लगनाला आणि आज हा प्रसंग .........
तो आला होता त्याने मला स्पर्श करायचा प्रयत्न केला होता पण .............
 
अशीच काही वर्षान पूर्वीची गोष्ट मी आजारी होती . आराम करण्यासाठी डॉक्टरांनी मला फार झोप येईल अशी  औषधे  दिली होती .उन्हाळ्याची दुपार होती गर्मी नि मी  त्रासली होती. त्यामुळे मी पंख्या  खालीच उशी टाकून झोपली होती.गुंगीच्या औषधा मूळे झोप अनावर झालेली संध्यकाळ होत आलेली तरीही मी उठू शकत नव्हती. अतुलनी मला बळजबरी उठवले त्यांना चहा हवा होता. मला उठणे शक्य नव्हते आणि अतुलला स्वतः चहा करणे हि शक्य नव्हते कारण अतुलचा  पाय प्लास्टर मध्ये होता मलाच जावे लागणार होते. 'थोडा वेळाने उठू का? ' मी अतुलला विचारले पण नाही 'तू दोन सेकंदात उठली पाहिजे अतुल ने मला ओर्डर दिली. मी कशी बशी उठली, किचनपर्यंत जात नाही तोच मी जिथे उशी टाकून झोपली होती तिथेच धाड्कन  पंखा येऊन पडला. हाय !! हे काय झाले !!! माझ्या डोळ्यांवरची झोप खाडकन उडाली.
पुन्हा तो आला होता आणि त्याने पुन्हा मला  स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. पण ह्या वेळेस सुद्धा............
 
माझ्या आयुष्यातला  हा तिसरा  प्रसंग मला ज्या गोष्टीची भीती वाटायची त्या गोष्टीची माझ्या मनात आता दहशत निर्माण झाली होती. मागच्या वर्षीच्या पावसाने आमच्या नासिकला तर सगळीकडेच हा हा कार माजवला. आमच्या बिल्डींगचा एक मजला पाण्यात बुडला. आमच्या दोन चाकी गाड्या वाहून गेल्या .आमची मारुती कार पूर्णपणे  पाण्यात बुडालेली होती रात्री खूप उशिरा पुराचे पाणी ओसरले . दुसऱ्या दिवसाची सकाळ  सर्व घाण, चिखल आवरण्यात जात होती.सगळीकडे साफ सफाईचे काम सुरु झाले. मी पण घराच्या बाहेर साफ सफाई करायला गेले. खूप लांबवर  कुठेतरी वाहून गेलेली माझी स्कुटी शोधून आणली .तिला स्वच केली. नंतर मारुती कार स्वच्छ  करायला घेतली. मी एकटीच गाडी साफ करत बसली .गाडीचे दरवाजे उघडले , गाडीतला सर्व चिखल धुवून काढला ,गाडीत वाहून आलेली वेळी मी हात घालून स्वच्छ  करत होती .त्या क्षणाला काही समजलेच नाही. डोक्यात एकच होते हि गाडी सगळी स्वच्छ करायची . अचानक अतुल हाक मारू लागले ,"अनघा लवकर वर ये मला खूप भूक लागलीय नष्ट करून दे."
"थांबा जरा आता फक्त बॉनेटच  साफ करायचे राहिलेय ते करते आणि येतेच ."
पण नाही... "तू दोन मिनिटात वर ये, बॉनेट साफ नको करू." अतुलची परत ओर्डर.
तितक्यात तिथे आमच्या ऑफिसचा  ऑफिसबॉय तिथे आला, " बाईसाहेब , तुम्ही जा वर मी करतो हे साफ."
तो एकदम आदबीने बोलला.
बर म्हणून मी गाडी कडे पाठ फिरवली. आणि त्याने बॉनेट उघडले. बस बॉनेटमधून एक भला मोठा नाग फना काढून उभा ..नागाला बघून माझ्या तर पाया खालची जमीनच सरकली. आता अतुल स्वतच खाली आले मला सावरायला .
तिन्ही वेळेस तो यायचा प्रयत्न करत होता पण तिन्ही वेळेस माझ्या सोबत अतुल होते मला सावरायला .....  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी