शब्द बापुडे केवळ वारा


बर्याचदा आपण एखाद्या वाक्याने ईतके disturb होतो........ काय असत बर त्या वाक्यात विशेष अस .....पण आपण सहसा त्या वाक्याकडे लक्ष नाही देत आपण फक्त ती भावना जगत असतो.वाक्याच्या मागील भाव काय आहे आपण याचाच विचार करतो पण ते बोचर वाटणार वाक्य आपण कधी खोलून बघतो का? खर म्हणजे समोरचा काहीतरी बोलतोय त्या वाक्याला खोलून बघितले तर बरेच गैरसमज दूर होऊ शकतात .पण नाही त्या क्षणाला त्या सगळ्या गोष्टी ईतक्या निष्क्रिय वाटत असतात आणि त्या मागची भावना हीच श्रेष्ठ ठरत असते.आणि मग भले मोठे गैरसमज करून आपण मोकळे होतो.

आई मुलाला ओरडते किंवा नवरा बायकोला.... बायको नवर्याला बोलते कि आटपा लवकर, .....लवकर लवकर हात उचलता येत नाही का......गॅस चालू होता तुझं लक्ष कुठे होत.... हे साधे वाटणारे बोल काहीना अपमानास्पद वाटतात ...पण वाक्य खोलून बघायची सवय लावली तर लक्षात येईल कि त्या वाक्यात समोरच्या साठी फक्त काळजी आणि प्रेमच असते...आपल्या व्यक्तीला ओरडणे किव्हा त्याचा अपमान करणे हा हेतू कधीच नसतो तर त्याकडे नीट बघितलं तर समजते हि काळजीच आहे आणि काळजी हि प्रेमातूनच येते......मग त्या व्यक्तीचे प्रेम झिडकारून त्या व्यक्तीच्या शब्दाचा गैरअर्थ का घायचा??? ....

आज मी बाहेर रस्त्यावर एक किस्सा बघितला एक बाई धावत धावत नवर्याला काहीतरी सांगायला येत असेल बहुदा ..पण तिच्या धावत येण्यामुळे तिला आजूबाजूच्या गाड्यांचे भान नव्हते...आता नवरा तिला जोराचा ओरडला...बाईनीपण चांगलाच तोंड सुख घेतलं कि मी एव्हडी तुमच्यासाठी आले त्याच काहीच नाही....आता हा प्रकार दोघांनी किती समजुतीने घेतला असता!!!!!!! तिने त्याच्या ओरडण्याची भाव फक्त घेतले पण त्या ओरडण्या मागे असलेली तिच्यासाठीची त्याची काळजी तिला मात्र समजली नाही...अडाणी पणा म्हणा की कमी समज तिला तो अपमान वाटला आणि ती रस्त्यावरच आपल्या अपमानाचा बदला घ्यायला कंबर खोचून तयार...येथे दोघांची समज कमी पडली...हे मात्र नक्की.....

एकदा खरेदीला गेले तिथला किस्सा तर अजूनच भयाण.एका माणसाने त्याच्या बायकोला खाडकन गालात लगावून दिली ....बर हा ईतका अपमानास्पद किस्सा मला स्वताला बघताना वाटला तर त्या बाईची स्थिती काय झाली असेल...तिच्या नवर्याला मधुमेह असावा चांगला ढेरी पण सुटलेला होता तो.... तिने खरेदी करताना त्याला गोड पदार्थ घेऊ नकोस ईतकेच सांगितले...त्याच उत्तर त्याने ईतक वेगळ का द्यावं? त्याने फक्त तिचा विरोध बघितला पण वाक्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे तिची त्याच्या साठीची काळजी हि त्याने बघितली नाही...तिचे मला जास्त कौतुक वाटले ते असे कि त्याने तिचा अपमान केला तरी तिने हि सगळी गोष्ट ईतकी शांतपणे घेतली अतिशय कौतुकास्पद,, तिने एका शब्दाने त्याला विरोध केला नाही त्याच्यावर ओरडली नाही.......

समंजस पणा हा खरच वागण्यात असतो . लगेच कुठल्याही गोष्टीवर प्रत्रिक्रीया न देता त्या वाक्यामागचा अर्थ बघणे गरजेची गोष्ट आहे .

म्हणून शब्दाचे अर्थ नेमके बघा ...शब्द उलगडून बघायची सवय लागली तर आपोआप बरेच प्रोब्लेम संपू शकतील

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

फिरुनी नवी जन्मेन मी