क्षण



क्षण क्षण ते भंगुर
माझ विसावल डोळ
एका एका क्षणाकडे
 आता माझं मागण
भरभरून आनंद
दुख ही दिल वाटी
विरहाच्या प्रेमापायी
जीवन बघितले काही. 
क्षण क्षण रे माझ्या
मला खूप शिकवलं
हताश होता होता
उभारीही देत गेल.
क्षणाक्षणारे मला
जीत का दिली
जीत देता देता
हार पण पचवली.
क्षणा क्षणारे माझ्या
 स्वाभिमान शिकवला
अपमान लाचारीला
जीव माझा जाळवला.
काय मागू मी आता
 सारे सारे तू दिले
द्याया विसरला आनंद
क्षणा क्षणात जे आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी