मन....


 मनाचा थांगपत्ता लागलायका कुणाला? आपल्या मनात असंख्य गोष्टी चाललेल्या असतात समोरच्याला त्याची चाहूल सुधा लागत नाही . समोर आनंदी दिसणारा व्यक्ती मनात कित्येक वेदना घेऊन जगत असतो .आणि त्या वेदनांसह समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती समोर आपला हसरा चेहरा दाखवत असतो . कोणालाच कोनाविषयी  काही समजत नाही अगदी बेस्ट फ्रेंड म्हणवला तरी त्याला आपल्या जिवलग मित्राच्या/मैत्रिणीच्या मनात काय चालले आहे हे समजत नाही .
एकांतात मन हव्या त्या दिशेला भरारी घेत असत. आयुष्य म्हणजे काय हे कोड उलगडण्याच्या प्रयत्नात असते. बुद्धी, हदय, आणि संवेदना याची सांगड घालून योग्य त्या दिशेने प्रवास करणे अतिशय गरजेचे आहे .मन  आणि मनानेच स्वीकारलेली ती दिशा अतिशय वैविध्यपूर्ण सृष्टीने नटलेली असते . त्यात रममाण होताना स्वातंत्र आणि स्वैराचार  या भेदाची जाणीव असणे गरजेचेच  आहे .शेवटी मनाचेच मनोराज्य ते कुठे कुठे आणि कसे कसे भटकून येतील सांगता येत नाही.
आयुष्याचे स्वरूप समजणारे क्षण प्रत्येकाला समजतातच असे नाही पण ज्याला समजते तो आपल्या मेंदूच्या आराखड्यात बसेल असा  योग्य मार्ग निवडून त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो . आणि खरतर तटस्थ पणे ह्या कडे का नाही पहावे . मन जाणते पणी स्वीकारते ते परिभ्रमण आणि फक्त स्वताच्या मजेसाठी भ्रमण . म्हणजेच आपले आयुष्य विकसित करण्यासाठी  जाणतेपणी स्वीकारलेली गोष्ट जीवन घडवते किव्हा जीवनाची घडी बिघडवते .
पण आपल्या स्वकेंद्रित जगा पलीकडे सुद्धा एक सुंदर जग आहे  निसर्ग सौंदर्य्, ,सेवा संस्था ,गरिबी लाचारी , दुखी  पिडीत , रक्तपिपासू ...ह्या सगळ्याकडे आपले मन खेचले गेले तर स्वताच्या स्वार्थी मनाच्या गरजांची पण लाज वाटेल.
जीवन म्हणजे नुसते साठवलेले डबक नाही तर ते एक प्रवाही पाणी आहे . माझ जीवन कोणासाठी उपयोगी आहे का? कि फक्त स्वताच्या आनंद साठी मी जगतेय/जगतोय.
मनाच्या एका कोपर्यात कुठेतरी दडलेले माझे चांगले मन आहे. त्याला का बाहेर काढायचे नाही?
मनाच काय काहीही चालेल पण आपल हदय, मेंदू  शाबूत ठेवायलाच हवे  ...........

अळवावरच्या पाण्यासारखं मन - चंचल, अस्थिर, आकर्षक आणि क्षणभंगुर. पण तेच मन कधी पहाडाहून अवजड होतं, कधी वार्‍याहून अवखळ,अचपळ आणि चहाटळ होतं, कधी काळ्या डोहासारखं स्वतःतच डुंबून जातं, कधी पिंपळावरच्या वटवाघळासारखं उलटं लटकून स्वतःच घुमत रहातं.....................

अनघा हिरे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी