अनुभव

१९९५ सालची गोष्ट आम्ही घरातले सर्व धनबादला ( बिहार) जात होतो . करण होते बाबांचे हिंद मजदूर किसान पंचायतचे( एच .एम .के .पी ) अधिवेशन , आणि त्या बरोबर आमच्या सुट्ट्यांचे फिरणे  . एच .एम .के .पी ने रेल्वेच्या दोन बोगी बुक केल्या होत्या . आदल्या दिवशी जी गाडी जाणार तीच गाडी दुसर्याही दिवशी पण होती. सर्वांच्या सोईने आम्ही आदल्या दिवशी जाण्याचे  ठरवले .. आता अलाहाबादला गाडीचे इंजिन बदलण्यात येणार होते . आणि आणि हे सर्वांनाच माहित होते . पण आधीच्या स्टेशन वर गाडी पुढे गेली आणि परत तशीच मागे आली होती . अलाहाबाद आल्यावर आम्ही पाय मोकळे करायला नाईटी , बर्मुडा  वरच स्टेशनवर उतरलो .सवई प्रमाणे गाडी चालू झाली की आम्ही पळत गाडीचा डब्बा पकडायचो . पण आमच्या ग्रुप मधले एक परबकाका बर्मुडा घातलेले , गाडी चालू झाली तेव्हा आम्हाला टाटा करत स्टेशनवर बाकावर बसून  राहिले आम्ही पण दारात उभे राहून काकांना टाटा करत उभे होतो. आता गाडी परत मागच्या बाजूला येईन असे परब काकान प्रमाणे आम्हा सर्वाना वाटले . परंतु गाडी काहीपरत मागे आली नाही गाडी थेट विरुद्ध दिशेने धावू लागली .बिच्चारे परब काका दुसर्या दिवशी रात्री पर्यंत खिशातल्या फक्त २०  रुपयावर आख्खा दिवस घालवत बसले . दुसर्या दिवशी  जेव्हा परत युनियनने बुक केलेली गाडी स्टेशनवर आली तेव्हा ते त्या गाडीत बसले . आम्ही सगळे परब काकांना घ्यायला स्टेशन वर गेलो होतो खर म्हणजे त्यांना घ्यायला जायच्या मागे आमचा हेतू वेगळाच होता . सर्व मोठ्या नेत्यान बरोबर बर्मुडा घातलेले   परब काका खूपच मस्त दिसत होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी