पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
  कितीही आनंदाचे क्षण येतील आयुष्यात परंतु डोळ्याची एक पापणी कायम विरह आणि गतस्मृतीच्या रोमांचित क्षणांनी ओली होणारच का? सुखात जगत असतांना दुःखाने तयार झालेली पोकळी सलणार आहेच का मनात? वाटतं एकटंच सैराभैर पळत सुटावं, त्या आठवणींच्या वाटेने शोध घेत, निसटलेल्या क्षणांचा आणि तुझा देखील...... तुझीच अनघा
  आठवणींच्या वहीतील ते दुमडलेले पानं जरा दुमडलेलेच राहू दे. उगा उघडल्या जातील त्या काळजावर खोल कोरलेल्या जखमा आणि वाट मिळेल त्या ओथंबून आलेल्या अश्रूंना, उगा सैरभर धावाया. त्या दुमडलेल्या पानांवर ठेवले आहेत अनंत युगांचे माझे एकटेपण. छिन्नभिन झालेली केविलवाणी माझी आळवणी. अन अजून तिथे आहे तो आठवणींचा विस्तीर्ण किनारा. त्या विस्तीर्ण किनाऱ्यावर आहेत स्मृतींच्या लाटांची काही नमने. इथे हर एक लाटांमध्ये बळ आहे बघ त्सुनामीचे. जे तयार होऊ पाहत आहे नव्या जन्म घेतलेल्या स्वप्नांना उध्वस्त कराया. ऐक माझं , राहू दे त्या पानांची घडी तशीच, कितीही वाटत असेल तुला ओबड-ढोबड पण हीच माझ्या आयुष्याची ओळख आहे. *************** अनघा अतुल हिरे नासिक
इमेज
  त्या त्रिकोणाचा अर्थ विचारला होता तू मला, ते सूत्र बित्र नाही माहीत पण हे सांगू शकते परिपूर्ण 'मी' म्हणजे त्रिकोण. एक रेषा म्हणजे माझे कुटुंब म्हणजे माझी जबाबदारी दुसरी रेषा म्हणजे हा समाज म्हणजे माझे कर्तव्य आणि तिसरी महत्वाची रेषा म्हणजे तू तू म्हणजे मन मोकळा श्वास आणि उर भरून ठेवलेला श्वासातील सुगंध, तू म्हणजे एक मुक्त आभाळ आपल्या सहवासातील एकमेव ठिकाण, तू आहेस अस्ताव्यस्त स्वैराचार, म्हणजे मुक्त मी आणि माझ्यातला फक्त तू, तू आहे माझ्या हसण्याचे कारण आणि विरहातील उदासी, तू म्हणजे सर्व काही त्या दोन रेषांना पूर्ण करणारी ती तिसरी रेष आणि एक परिपूर्ण त्रिकोण, नाहीतर फक्त आणि फक्त दोन समान रेषा ..... अनघा अतुल हिरे नासिक
  तुझ्या छातीत उमटलेली वेदनेची कळ अशी कशी रे आली तुझ्याजवळ. कदाचित ती माझ्यासाठी होती आणि तू तुझ्या अंगावर झेलली अगदी नेहेमी सारखीच. माझ्या वाटेचे दुःख स्वतःच्या अंगावर ओढून घ्यायचा अगदी तसच . चुकला रे तू त्या वेदना माझ्या होत्या तो त्रास माझा होता. का स्वार्थी झालास तू मी मात्र भोगतेय त्या अनंत काळ पुरतील अश्या मरण यातना. तुझ्याशिवाय.…. खर सांग मी सहन करते त्या यातना सहन करण्याची ताकद नव्हती तुझ्यात ना? की माहीत होते तूला एकाच्याच वाट्याला आलेय हे मरण . मी मात्र अजूनही जगतेय तुझ्याशिवाय, कर्तव्य पार पाडण्याचा बुरखा पांघरून अन मृत्यूची वाट बघत..... निरंतर.... ( अनघा अतुल हिरे )
इमेज
  मनाला चटका लावून जाणारे लिखाण -- दहावीला असताना एक धडा होता अभ्यासाला. ऑरफियस आणि युरोडाईज यांचा. दहावीच्या त्या वयात माझ्या मनाला प्रेम काय असते ते समजले, आणि तेव्हाच माझ्या मनाने पक्के केले होते की आयुष्यात प्रेम करावे तर अगदी असेच जीव तोडून. ऑरफियस आणि युरोडाईज हे दोघे एकमेकांवर नितांत प्रेम करणारे, एकमेकांशिवाय जगू शकत नाही अशी अवस्था असणारे. पण अचानक एके दिवशी युरोडाईजचा साप चावून त्मृत्यू होतो त्यानंतर ऑरफियस वेडापिसा होतो आणि वेडापिसा होऊन तो युरोडाईजला जागोजागी शोधायला लागतो, वेड्यासारखा तिला शोधत शोधत तो स्वर्गात जातो स्वर्गात गेल्यावर देवांना म्हणतो देवा प्लीज मला माझी युरोडाईज परत दे. मी तिच्या शिवाय जगू शांत नाही. तिच्या सहवासा शिवाय राहु शकत नाही. देव पहिले तर त्याला नकारच देतो आणि मग नंतर म्हणतो तुझे प्रेम बघून मी हरलो आणि मी आता तुला तुझी युरोडाईज परत देतो पण माझी एकच अट आहे. तू तुझ्या युरोडाईजला घेऊन जा पण ती तुझ्या सोबत चालत येणार नाही. तू पुढे पुढे जाशील आणि युरोडाईज तुझ्या मागे मागे येईल. पूर्ण रस्ता तू तिच्याशी संवाद करणार नाही आणि भूतलावर पोहोचे पर्यंत ,
इमेज
  मी तुझी झाली म्हणून तु ही माझाच असला पाहिजे. हे बंधन नाही हट्ट होता माझा. माझ्या प्रेमाला एका कुपीत लपवून ठेवण्याचा. आवडत मला तुझं बनून जगायला... तुझ्या आजूबाजूस माझं वास्तव शोधायला.... नाही दिसला मागमूस तर घाबरायला होत, बिथरायला होत, आणि चिडायलाही होत. आणि सरते शेवटी मग अश्रुंच्याच सानिध्यात त्या गर्क काळ्या अंधाऱ्या, अनामिक भीतीत स्वतःला लोटायला ही होत. मग तिथेच शोधते एक धागा तुझ्या मायेचा, सहवासाचा त्या अंधारातून बाहेर यायला. सहजच जगते मी तुझ्या सोबत हर एक क्षणात सामावून घ्यायला..... तू असतोस सोबत पण तरीही का वाटते ती अनामिक भीती उद्याची..... खूप क्षण गमावले, आता उरलेले क्षण वेचून घे ओंजळीत तुझ्या दे दान मला त्या क्षणांचे बघ जमेल तुला, आपल्या प्रेमासाठी...... अनघा अनघा अतुल हिरे
इमेज
  आपले प्रेम जेव्हा शेवटचा श्वास घेत होते, कोमेजत होते, ते मरणा आधी कोमात गेले होते. बघायचे नव्हते त्याला माझे हाल ह्या उघड्या डोळ्यांनी. म्हणूनच त्याने मिटून घेतले स्वतःला. एका गाढ निद्रेत गेला शोधायला तो स्वप्नाचा गाव. हिंडला, फिरला पूर्ण गाव त्याने धुडळला.. कोरड पडलेल्या घशानेच आवाज देत होता स्वतःला स्वतःच्या नटखट,अवली, मस्तिखोर, मिश्किल व्यक्तीमत्वाला कोरड्या घशाने शोधत होता प्रेमाचा ओलावा. पण नाही..... तिथे त्याला माझेच काही अवशेष सापडले छिन्नभिन्न झालेले मन, व्याकुळ आर्जवे, विनवण्यांचे लक्तरे.... मन खूप व्याकुळ झाले त्याचे तुझा मागमूसही नाही त्या गावी उगाच साद देत राहिला. सध्या ऐकलंय कोमात गेल्यावर त्याने आत्महत्या केलीय म्हणे... अनघा अनघा अतुल हिरे
इमेज
  तुझ्या माझ्या भेटीची जागा मी शोधलीय. त्या समुद्रात... जेव्हा लाटांना उधाण आले असेल, वादळी वारा सुटला असेल, जो तयार असेल सर्व नेस्तनाबूत करायला. चल ये तेव्हा नक्की बघायला, कुणाची ताकद जास्त आहे, त्याची की माझी? आठवणींचे वादळ माझ्याकडेही आहे. आणि स्वतःला नेस्तनाबूत करण्याची शक्तीही. तू फक्त पाहिला आहे त्याचा आणि माझा शांत, शीतल सहारा. आता आमच्यातले हे वादळ पण अनुभवून बघ. तू येशील नक्की हे ताकदीचे दंद्व पहायला... अनघा अनघा अतुल हिरे