बालगीत


























दलबल दलबल धोताला
सगलेच लागले तिलवायला
आज एक दंम्मत झाली
आमच्या धलात माउ आली
सगल्याना थांगीतले
सगल्याना बोलावले
पकलुन थेवला ले
दलबल दलबल धोताला
सगलेच लागले तिलवायला
आईने मला खोबल दिल
मी ते माउला दिल
सगल्याना आपले आले हशु
मग मला फुत्ले ललू
दलबल दलबल धोताला
सगलेच लागले तिलवायला
लागवते मी मग तेव्हा
लुसून बसते तोपल्यात जेव्हा
तुनीत लत्त्श देत नाही ले
सगलेच नुत्ते चीलवतात ले
दलबल दलबल धोताला
सगलेच लागले तिलवायला

 -----------------------------------------------


गडबड करून दमलाय जाम
पाळण्यात झोपले इटुकले बाळ

चळवळ करणार
टकामका बघणार
इटुकल्या पिटूकल्याची एट पहा

टाळ्या वाजवणार
सायकल करणार
इटुकल्या  पिटूकल्याचे थाट फार

डोक्याचे त्याच्या चमन खुले
तोंडाच बोळक शोभून दिसे
इटुकल्या पिटूकल्याचे दिसणेच छान

डोळ्यात काजळ
हनुवटीवर तीट
पिटूकल्याला शोभे काळा तीळ

गडबड करून दमलाय जाम
पाळण्यात झोपले इटुकले बाळ

****************************************



चिव चिव चिमणी 
गाते छान 
हळूच करून 
तिरकी मान 


मिठू मिठू पोपट 
बोलतो गोड 
खाऊन घेतो 
पेरूची फोड 


कुकूच कू कोंबड्याची 
झाली पहाट
सगळ्यांना जागवायला 
गाणे गातो भाट


चिमणी न पोपट 
उडताय छान 
कोंबड्याची आपली 
कुंपणा पर्यंतच धाव 

*****************************************


गरम गरम भात
वरती तुपाची धार 
वरण ओतल त्यावर 
आली बहार 

सोबत होती कोशिंबीर
आणि लोणच्याचा खार 
सगळ्यांचा कसा 
भलताच थाट 

फू फू करत 
गट्टम गट्टम मस्त 
ताटातले जेवण 
झाले फस्त 

******************

अग अग चिऊताई
चिडतेस का?
खिडकीत जाऊन
बसतेस का ?

मुठभर तांदूळ
देते तुला
पकडून ठेव
चोचीत जरा

हवा का तुला
 बुंदीचा लाडू
मुठीत तो
नको ग आवळू

चिडण सोड
खाऊ खा
सगळयांमध्ये
मिसळून रहा

*********************


कावळ्याने घेतली   
आकाशात  झेप 
बघा त्याची कशी 
सगळे ठेवताय ठेप

पोपटाने आणले
पेरू लाल लाल 
भरलंय पोट माझ 
पार्टी होती काल

चिऊने दिली 
मोत्याची माळ
नको मला ती 
माझ्या पायात चाळ


कोकिळेने केले सुरु
गायनाचे क्लास 
सगळ्यांचा होतोय मला
भलताच त्रास 

ये रे कावळोबा 
नको भाव खाऊ 
आमच्यातून तू असा 
नको वेगळा राहू 

---------------------------------------------------------- 

मोराच्या पिसात 
रंग किती छान 
बघायला  लांडोर 
उंच करी मान

उंटाच्या मानेची 
करू घसरगुंडी 
चढायला  मोठी 
हवीय शिडी 

उंदराचे पडले 
पुढचे दात 
चीज खायचे  तर 
मिळाला भात 

घसरगुंडीला लावायला
 रंग छान छान 
चीजची आता
 घालू कमान

घसरगुंडी खेळायला 
आलाय कोण 
मोर आणि लांडोर 
सोबत उंदीर दोन 
--------------------------------------------------------------------

डौलदार  हत्ती त्याची 
डौलदार चाल
कुणाला सांगू नका 
त्याचीअवघडली मान

सोंडेचे वजन त्याला 
पेलवतच नाही
पोटाची  हालचाल 
सहन होत नाही 

जिम मध्ये जाऊन 
व्हावे स्लिम स्मार्ट 
पहिल्याच दिवशी 
त्याने तोडले रेकोर्ड 

डायटिंग करायचा 
निर्णय  घेतला 
ट्रकभर केळातच
जेवायचा थांबला

डायटिंग बियटिंग
पुरे झाले फॅड 
उगा काही दिवसातच 
मी दिसू लागेल मॅड 

म्हणो कुणी  लोद्या 
वा करो कुणी चेष्टा 
मी माझा बरा
सुखी माझ्या जगात 


------------------------------------------------
माझा कन्हैया

आज माझ्या स्वप्नात माझा बाळकृष्ण आला
बोबड्या बोबड्या बोलातच मागितले लोणी खायला

छोटीशी स्वारी, कसा चुरू चुरू बोलतो
म्हणे खाणे नको शिकाऊ मला, मी शिस्तीतच खातो

दाऊ भैयाची खोडी काढत, स्वत बसला रडत 
मार म्हणे हवे तितके मी नाही घाबरत 

लटके लटके राग धरत अऩं डोके खुपत गुडघ्यात
दंग कसा झाला मनु खोटखोट रडण्यात

शोनू माझा राजा शहाणा झाला
रोज आता अभ्यास करेल म्हणाला

अभ्यासात आता नको श्लोक वाणी
हवी त्याला एबीसीडी तिही रिदम गाणी

गाई चरायला स्वारी आता जाणार नाही
बॅटबॉल, बुद्धिबळ त्याला नवे नाही

गोड गोड बोलत त्याने फोन केला 
खेळायला नवी खेळणी हवीय  त्याला

एक सत्य मात्र त्याने सांगितले जाता जाता
प्रेमाची तू यशोदामैया पण जन्मदात्री ती देवकीच माझी माता

नंदाचा लाडला माझा कन्हैया
मला आज चक्क म्हणाला मैया


मला आज चक्क म्हणाला मैया....








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी