तिला हवा असणारा आधार ............



 

समिधा सर्वसाधारण गृहिणी .सगळ्याकडे लक्ष देणे आणि सगळ्यांची काळजी घेणे हेच तीच आयुष्य होते .अंगातले सुप्त गुण बाहेर यावे अशी ईच्छा, थोडस नेटच ज्ञान यामुळे ती प्रगतीच्या दिशेने पुढे पुढे जायला लागली .कुठलीही गोष्ट करून बघावी माघार घेऊ नये या स्वभावाने हळू हळू तिला यश मिळू लागले . अचानक तिचे आयुष्य बदलले . तिच्या आयुष्यात स्वप्नील आला .फोनवरून कामा संदर्भात रोज बोलणे व्हायचे , हळूहळू  गप्पा आणि नंतर गप्पांचे रुपांतर एकमेकांचे पॉब्लेम शेअर करणे ईथपर्यन्त  त्यांची मैत्री वाढली. 
हे आपल्याला काय होतंय . याची पूर्ण समज तिला होती ..तिला हळूहळू समजू लागल कि आपण प्रेमात पडतोय पण आपल्याला समाजाच्या बंधनात राहायचंच आहे शेवटी काय ! मनात फुटलेला प्रेमाकुर तिने जागीच चिरडला .आणि पुन्हा एकदा घर कुटुंब ,मुल याच्यात गुंतून गेली .
सामिधाचा विचार करता ती छोट्या शहरातली असल्या मुले तीला तिच्या भावना आवराव्याच लागल्या .नेमक काय ग ? अस विचारलं तर तिने सांगितले 'नको ग बाई, मला तो खूप आवडायला लागला होता .दिवसों-दिवस  अगदी टिनएजर सारख बिहेव्ह करायला लागली होती . त्याच्याशी एक दिवस बोलली नाही तर मी अस्वस्थ होते. त्याला बघायची ईच्छा, त्याला भेटायची ईछा निर्माण होतेय . आणि त्याला स्पर्श करण्याची ईच्छा झाली तर? तर मी काय करू ? माझ्याच भावनांचा माझ्यावर कंन्टरोल  राहिला नाही तर? तीला तिच्याच प्रश्नांनी इतक  ग्रासलं होत की ती शांतपणे स्वतः स्वतःची मदत करू शकत नव्हतीच .मी तीला काय सल्ला देणार? की प्रेम ही  नित्सिम भावना आहे , कि प्रेमाच्या पातळीपर्यंत जाऊन केलेली मैत्री नक्कीच श्रेष्ठ.  प्रेम म्हणजे मिलनच नाही काही. प्रेमाला आणखी एक बाजू असते ती म्हणजे श्रद्धा  , विश्वास . मैत्री ही त्या क्षितिजा सारखी आहे ग! दुरून बघयला मिलनाचा भास होणारी एकमेकात एकरूप झालेली प्रत्यक्षात मात्र नेहमीच एक अंतर राखून असलेली. कुणाच्या भीतीने नव्हे .स्वतः स्वतःसाठी घातलेली मर्यादा! तरीही वरकरणी माझ्याकडे दोनच सल्ले होते एक तर तू मन मारू नकोस किंवा स्वताला सावर पण मी तेही उपाय तीला सांगितले नाही .
 तिला  त्या व्यक्तीचा एक मानसिक, भावनिक आधार मिळाला होता .पण हा आधार पेलण्याचे बळ तिच्यात नाही म्हणून तिने तो आधारच झिडकारला . तिला  अस वाटणं अगदी  नैसर्गिक आहे. 
स्त्रियांना सतत भावनिक, मानसिक आधाराची गरज असते कायम त्या कोणावरतरी अवलंबून असतात मुळातच स्त्रिया ह्या फार भावनाशील असतात आणि लगेचच भावनेच्या आहारी जात असतात .त्या काल्पनिक गोष्टीत रममाण होणार्या असतात .तर पुरुषांना वास्तवतेचे भान असते . त्याला वाटते जर मी प्रेम करतो तर हे वारंवार सांगण्याची काय गरज ? पण तसे नसते.तिला वरवर त्या प्रेमाची प्रचीती हवी असते. कारण स्त्रियाच स्वभाव हा मुळातच सुरक्षितता शोधात असते.प्रेमाची सुरक्षितता तिला मिळाली तर ती काय शांत राहू शकते. 
स्त्री जेव्हा प्रेमात पडत असते तेव्हा तिच्यात पूर्ण समर्पणाची भावना असते . ती आपल सर्वस्व पणाला लावून त्याच्यावर जीवापाड प्रेम करत असते . पण तश्याच  भावना तिला परत मिळाल्या नाही तर त्या अपेक्षाभंगात नवीन त्रासाचा जन्म होतो . मुळात तिची अपेक्षा काही चुकीची नसते .तिला जेव्हा आधाराची गरज असते आणि तेव्हा जर तिला नवरा  आधार देऊ शकला नाही तर तो महाभयंकर गुन्हा करून गेलेला आहे अस ती समजायला लागते .
बर्याचदा अस होत कि नवरा हा  बायकोला समजून घ्यायला कमी पडतो. तिला हवा असणारा मानसिक, भावनिक आधार द्यायला तो  कमी पडतो .स्वप्निलकडे समिधा आकर्षित का झाली ? अर्थात त्याचा स्वभाव,तिच्या समस्यांवर त्याने  समजूतदार पणे काढलेले उपाय या व्यतिरिक्त असे वेगळे  काय होते? जो आधार ती इतके दिवस तिच्या नवर्यात शोधत होती तो अचानक  तिला मित्रात सापडला. 
बायको  जेव्हा  आपल्या व्यतिरिक्त तिच्या मित्राकडे आपले मन मोकळे करते तेव्हा ह्या प्रकारात नवर्याचा ईगो दुखावतो त्याच्यातला नवरा जागा होतो .वास्तविक पाहता पहिल्या स्टेप मध्ये तिने ही  संधी नवर्याला  दिलेली असते .पण तिथे तो कमी पडलेला असतो  मग भावनिक गरजांसाठी ही मित्रावर अवलंबून राहायला लागते. गम्मत म्हणजे हा मित्र आपल्या मैत्रिणीचे सर्व प्रॉब्लेम सोडवायला पूर्ण परफेक्ट मनुष्य असला तरी त्याच्या स्वताच्या बायकोच्या बाबतीत परफेक्ट नवरा कदाचित नसतो . मग असा दुटप्पी मनुष्य आपल्या बायकोकडे लक्ष देतोय त्याने हा (नवरा ) अजूनच त्रासतो.आणि पुन्हा नवीन वाद होतात .त्याचा विरोध हा बायकोच्या आयुष्यात आलेल्या पुरुषालाच असतो .हे समजून घ्यावे .यात कुठलेही वादाचे मुद्दे तयार करण्यापेक्षा शांतपणे निर्णय घेणे गरजेचे आहे .जसा निर्णय सामिधाने ह्या घडीला घेतलाय ..मित्र आहे पण नवर्याच्या भावना न दुखावता त्याच्या चौकटीत बसणार असेल तरच ...

अनघा हिरे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी