आई सगळीकडेच आहे

गेल्या आठवड्यापासून कोकणातला दोरा चालू होता . दोन महिन्यांपूर्वी  सुद्धा मी कोकणातच होतेआणि अचानक बाबांचा फोन आला  की तुम्ही ताबडतोब  निघून याआईला बरे नाही. मालवणपासून नासिकला पोहचायला  मला जरा उशीरच झाला आई आम्हाला कायमचे सोडून निघून गेली होती.दोन महिन्या नंतर मी परत कोकणात आले व रस्त्याने जसजशी गाडी पुढे जात होती तसतश्या रिव्हर्स मध्ये माझ्या स्मृती जात होत्या. मनात एक शंका आली आपण कोकणात होतो कदाचित आई आपल्याला शोधायला कोकणात तर आली नसेल  ना? आणि माझ मन कोकणच्या रस्त्याने भटकू लागल . आईला मी कुठे शोधू, माझी आई मला कुठे सापडेल याचाच विचार करत मी रस्त्याने फिरले. त्याच दिवशी  मी खूप आजारी पडले . आता आपली कोकण ट्रीप वाया जाणार आपल्याला आई सापडणार नाही . 
आम्ही जिथे राहत होतो तिथल्या काकूंनी माझी खूप सेवा केली .त्यांनी मला काय हव नको सर्वच बघितलं. आजारपणामुळे  मला झोपूनच राहावे लागायचे बाहेर पडणेही शक्य नव्हते . तसेच  काही दिवसात मला नासिकला परतावे लागले. जड अंतकरणाने मी नासिकला आले . आई भेटलीच नाही याचे दुखः मनात होतेच आणि अचानक जाणवले अरे आई तर मला भेटली होती त्या कोकणातल्या काळजी घेणाऱ्या  काकूंच्या रुपात . आई मला नेहेमीच भेटते अधिकाराने बोलणाऱ्या बहिणीच्या रुपात, काळजीचा हात फिरवणाऱ्या भावजयीच्या रुपात .. आई सगळीकडेच आहे . आईचे शरीर संपले आहे पण आईचा आत्मा सर्व गोड लोकांमध्ये आहेच.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी