अनुभव

ते माथेरानचे जंगल होते वेड्यासारखं आम्ही दोघे जंगलातून फिरत होतो . रस्ता चुकलेलो , काळाकुट्ट  अंधार समोर कुठल्या क्षणाला काय येईल याची कल्पनाही करवत नव्हती . वाट फुटेल तिथे आम्ही धावत सुटलो होतो.लग्न होऊन दोनच दिवस झालेले , आज हे भलतच डेअरीग  करून बसलेलो .एकमेकांना सांभाळत सावरत आम्ही जात होतो मुसळधार पावसामुळे दोघेही ओलेगच्च भिजलेलो त्यात तुटलेली चप्पल हातात घेऊन पायाला काय टोचतंय काय चावतंय कशाकडेच लक्ष नाही . अचानक लांबवर आम्हाला मिणमिणता  दिवा दिसला . आता त्या दिव्याच्या दिशेने आम्ही जायचे ठरवले अचानक आमच्या दोघांचाही पाय घसरला आणि तिथे खोल उतार आहे हे आमच्या लक्षात यायच्या आत आम्ही घरंगळत खाली जाऊ लागलो कसबस एका ठिकाणी सावरलो आणि बघतो तर काय सावरण्यासाठी ज्या दगडाचा आधार घेतला तो दगड म्हणजे एका विहिरीचा कठडा होता .   धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे कुणालाही आमचा आवज ऐकू येत नव्हता . 
अरे देवा! आता काय करायचे? मला तर रडायलाच यायला लागले. माझा नवराही घाबरलेला पण तो तस काही दाखवत नव्हता. शेवटी चुकून एका घराबाहेर आलेल्या माणसाला आमचा आवाज ऐकू आला." तुम्ही जंगलातून कशाला जातायेत गावातले लोक सुद्धा जंगलातून जात नाही . पूर्ण फिरून या आणि रेल्वेरुलावरून चालत जा." त्या माणसाने दिलेला मोलाचा सल्ला घेऊन आम्ही रेल्वे रुळावरून आमच्या M .T .D .C च्या हॉटेलकडे निघालो.
अनघा हिरे 
नासिक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी