जोडीदाराच्या भावनांचा आदर करा


 तुझ माझ्या जवळ असण
म्हणजे मोरपिशी स्वप्न
अलगद स्पर्शून, अंग अंग मोहरणार
 तुझ माझ्या जवळ असण
म्हणजे फुलांचा सुगंध
 रोम रोम हर्षून ,सतत दरवळणार
 तुझ माझ्या जवळ असण
म्हणजे शांत संध्याकाळ
अंगाला बिलगलेली जणू गुलाबी शाल
 तुझ माझ्या जवळ असण
म्हणजे पहाटेचा गारवा
स्पर्शास्पर्शातून दवा प्रमाणे भिजवणारा
 तुझ माझ्या जवळ असण
म्हणजे कोकिळेचे गायन
भावचीत्त हरवलेले मनमोहक जीवन
 तुझ माझ्या जवळ असण
म्हणजे श्रावण सरी
मन उल्हासित करणाऱ्या भावनांचा ओलावा
 तुझ माझ्या जवळ असण
म्हणजे माझी प्रीत
माझ्या स्वअस्तीवाची ओळख..........................


प्रेम म्हटल कि प्रेम अनेक रंग रुपात डोळ्या समोर फिरते . प्रेम ही नित्सिम भावना आहे .प्रेम म्हणजे चहुबाजूने दरवळणारा  एक सुगंध. प्रेम म्हणजे जगण्यासाठीचा   श्वास . प्रेम म्हणजे सुख्दुखाच्या गणितातून उरलेली बाकी .प्रेम म्हणजे छाया निरंतर नात्याला थंडावा देणारी 
 जोडीदारातील भेद, गुण समजून घेतले तरच आपण नित्सिम प्रेम देऊ शकतो किंवा स्वीकारू शकतो .हे भेद मान्य  करून त्यांचा आदर  करण्याची  ताकद  असणारेच योग्य प्रेम जगू शकतात. प्रेम म्हणजेच समजून घेणे सहकार्य करणे होय. आपल्यातील भेद व वैशिष्ट समजून घेतली तसेच जोडीदारा विषयीचे   भेद , वैशिष्ट्य समजून घेतली तरच प्रेम फुलवता येईल .
                   काय हरकत आहे दोघांनी एकमेकांचे मन सांभाळले तर .....आणि काय हरकत आहे एकमेकांनी स्वतामध्ये थोडेसे बदल घडवून आणले तर.. हे बोलणे जरी सोपे असले तरी कृतीत उतरवणे जरा अवघडच होऊन बसते . एक साधीशी सोप्पी वाटणारी गोष्ट मनुष्य आपल्या 'स्व'बळावल्यामुळे किंवा आपल्या अहंकारापोटी करत नाही. अन्याय होणाऱ्या ९७% बायकांचे  हे  म्हणणे  आहे  आमचा  नवरा  आम्हाला  मारझोड  करतो. पण  त्याने  केलेल्या  ह्या  कृती  बद्दल अजून एकदाही दिलगिरी व्यक्त केली नाही.  मुळातच मारझोड करणे हे असभ्यतेचे लक्षण  आहे  .पण  मार झोडीचा  प्रकार  हा  फक्त  झोपडपट्टीत  होतो अस नाही, तर  मोठ्या  अलिशान  बंगल्यात  पण होतो . म्हणजेच  आर्थिक  दुर्बल घटकांमध्येच   असभ्य वर्तन करणारे लोक आहेत अस नाही तर आर्थिक सबल  गटात सुद्धा हे प्रकार दिसतात. मग प्रश्न येतो शिक्षणाचा तर अशिक्षित मनुष्य बायकोला मारझोड करतो आणि सुशिक्षित मनुष्य बायकोला मारझोड करत नाही असेही नाही. प्राचार्य, इंजिनिअर ,डॉक्टर, अश्या  उच्च  पदव्या मिरवणारे लोक सुद्धा अश्या प्रकारचे  असभ्य  वर्तन  करतात  . मनुष्याने स्वताच्या मानसिक भावनांचा  विकास करणे गरजेचे आहे. काय योग्य काय अयोग्य याची पारख करणे स्वताच्या मनाला समजले पाहिजे . जो स्वतामध्ये कधी विकास करू शकत नाही तो आपल्या जोडीदाराच्या  भावना  समजून  घेण्यासाठी स्वतामध्ये काय विकास करणार !हा मोठा प्रश्न आहे मग अश्या लोकांच्या  जोडीदाराचे काय? त्यांच्या मनाला तर हे लोक कधीच समजून नाही घेणार शिवाय धाक, दडपशाही, अरेरावी हे प्रकार तर करणारच. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी