'निस्तब्ध '






तू तसाच स्तब्ध उभा राहा 
माझी वाट बघत 
क्षितिजाच्या त्या अंताशी 
मी तुला भेटेल 
बघ मग निर्माण होईल एक सुरेल संगीत 
आपल्यातल्या एका नव्या नात्यासह 
नव्या संगीतात हरवून जायला 
मी नक्की येईल
तू तसाच स्तब्ध उभा राहा 
माझी वाट बघत 
आपले प्राण एकवटून 
आणि आठव त्या गीत्तांना 
ज्यांनी साथ दिली तुझ्या एकांतात 
मी नक्की येईल
तू तसाच स्तब्ध उभा राहा
'निर्विकार ' 'निस्तब्ध '...


अनघा हिरे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी