निवडणूक आणि उमेदवारांमधल्या गमती जमती

निवडणुकीचे दिवस सुरु झाले तसे  वॉर्ड वॉर्ड चकचकीतदिसायला सुरवात झाली. अचानक नगरसेविका बाईनी पाच वर्ष न केलेली कामे बाहेर आली आणि मतदानाच्या केवळ एक महिना आधीच रस्त्याने पिव्हीलेज ब्लोग लावण्याचे काम रात्रन दिवसाच्या मेहनतीने केवळ दोन दिवसात संपवले नदी किनार्याची  सुरक्षा भिंत बांधण्यात आली. पण याला काही अर्थ उरला नाही आणि आता ह्या कामाची किंमत शून्य झाली. कारण निवडणुकीला उभ्या असणार्या निम्याहून अधिक उमेदवारांनी ही असल्याच स्वरुपाची कामे सोसायटी सोसायटीत चालू केलेली आहे .कुणी  वॉल  कमपाउंड करून देतोय ,कुणी नावाचे फलक लावताय कुणी ड्रेनेजची कामे करतोय . जो तो आपापल्या खिशातले पैसे खर्च  करून अचानक लोकांना सेवा पुरवायला लागला आहे . पण लोक काय  अडाणी आहेत का? त्यांना काहीच समजत नाही का? आज स्वतःच्या पैश्याने खर्च करणार नंतर हाच पैसा कुठून वसूल करणार आहे . सर्वाना सर्व काही माहित आहे.. 
ह्या  सर्व बाबतीत हसू , टिंगल , आणि मजेचेच किस्से जिकडे तिकडे ऐकायला मिळतात आता ही मजा मी एकटीनेच माझ्या जवळ ठेवायची जरा अन्यायच आहे ना! म्हणून म्हटलं चला सर्वांचे ही मनोरंजन करावे. 
आमच्या   एका नातेवाईकाने सांगितले की त्यांच्या वार्डात प्रत्येकी एका मताची किंमत सात हजार  आहे . आणि त्या मान्यवर उमेदवार बाई प्रत्येक मताला सात हजार रुपये मोजत पण आहे. 
मागे एका निवडणुकीच्या वेळेस प्रसिध्द महापौर बाईंनी पिम्पाचे फक्त झाकणच वाटले . निवडून आले तर पिंप मिळतील. हा नंतर लोकांना ही पिंप मिळून गेला ही गोष्ट निराळी .
एका प्रभागात तर एक अगदी प्रेमळ , लोकांना सतत मदत करणारे डॉक्टरसाहेब लोकांचे अगदी लाडके कुणाकडे पैसे नसतील तर वेळेप्रसंगी आपल्या खिशातून पैसे काढून औषधे  आणि फळे घ्यायला लावणारे डॉक्टर म्हणजे देव माणूस. ह्या डॉक्टरांची बायको त्याच्या अगदी विरुध्द स्वभावाची , तिरकस शिष्ठ कुणाशीही कधीही साध स्माईल न करणारी , नवर्याला काही बिझनेस जमत नाही . सगळे आपल्या नवर्याला लुटायला बसलेलेच आहे मग आता आपल्यालाच सर्व सूत्र सांभाळले पाहिजे  अश्या ह्या अविरभावात जगणाऱ्या   बाईना त्यांच्या नवर्याने मुद्दाम निवडणुकीला उभे केले . आता त्या पुरत्या सरळ झाल्या उठ की सूट सर्वाना स्माईल आणि नमस्कार करत सुटल्या . दिसला कोणी की जोड हात , दिसला म्हातारा की कंबरेत वाक. नमस्कार.... ही..ही..ही.. आणि हे सतत बर का! त्या वार्डात आलेला एक पाहुणा म्हटला मला कशाला नमस्कार मी बाहेर गावचा आहे. ' जाऊ द्या तरीही नमस्कार ... ही..ही..ही... ' डॉक्टर साहेब म्हणताय चला सात आठ हजार रुपये पत्रक झापायला गेले पण बाई पुरती ठिकाणावर येतेय ना! 
कितेक महाशयांनी सोसायटीत मुल्लांसाठी खेळणी बसवली. पार्किंगची सोय करून दिली. एकाने तर तुमचा एन .ए टॅक्स भरून देतो असे प्रत्येक बिल्डींग वासियांना सांगितलं.अचानक समाज मंदिर तयार होऊ लागले. 
अजून  एक गंमत  दोन भावंडांचा खूप गाजलेला किस्सा हे दोघे भावंडे एकमेकान विरोधात उभे , मग एकमेकांना वरचढ तर झालेच पाहिजे ना.एकाच्या बायकोने मंगल कार्यालय बुक केले  आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला. खास सुरात वरून किलोच्या भावात वाटायला साड्या आणल्या . २ तासात हळदी कुंकाचे पार रूपच बदलून गेले . सर्व साड्या अचानक संपल्या. कारण झोपडपट्टी मधल्या बायका सारख्या सारख्या कपडे बदलून आणि अवतार बदलून येत होत्या. आता दुसरा भावाची बायको ती तरी मागे कशी राहणार . तिने पण कार्यालय बुक केले आणि तिने हंडे वाटले.
हळदी कुंकाच्या ह्या किस्स्यावरून आठवलं आमच्या वार्डात पण घरोघरी  जाऊन एका बाईंनी हळदी कुंकू वाटले. तिळगुळ आणि हळदी कुंकू  बस ईतकेच पण त्यात किमान कुठली लालूच तरी नव्हती ते बर नाही तर त्या बींची गणना सुद्धा आम्हाला ईतर उमेद्वारांप्रमानेच करावी लागली असती.
वॉडावॉडात अचानक येव्हडे समाज सेवक कसे काय निर्माण झाले. आणि त्यांना पण अचानक जाग येऊन केव्हडे काम करायला लागले ते . पण पाच वर्षान पूर्वी पुरात लोकांचे घरं पाण्यात होते. दुकानात घरात पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान झाले लोकांना नव्याने संसार उभारावे लागले आम्ही स्वतः  तळमजल्यावर राहणाऱ्या लोकांच्या  घरात शिरलेला गाळ साफ केला . परिसर साफ केला .दोन दिवस लोकांना  प्यायला पाणी नव्हते. जेवायला नव्हते , दोनदिवस लोकांच्या  घरात अंधार होता. तेव्हा यातला एकही नगर सेवक आणि सध्या निर्माण झालेले समाज सेवक लोकांच्या   मदतीला धावून  आले नाही .
कान्याकोपर्यावर त्यांनी पोसलेले गुंड रस्त्याने बायका मुलींची छेड काढताच आहे . बायका लज्जित होताच आहे. त्यांनीच पोसलेले गुंड(कार्यकर्ते) खून , हाणामार्या, बलात्कार करताच आहे .मग खून होणारा शिक्षक असो अगर दहा वर्षाची लहान मुलगी .ह्या असल्या वातावरणात आम्ही नागरिक राहत आहोत .
आता परत डोळे झाकून यांना मत दिले तर आमच्या सारखे मूर्ख आम्हीच. 
अनघा हिरे
नासिक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी