शिक्षक आणि जनगणना

भर दुपारी धापा टाकत एक बाई आल्या हातात कागदाचा भला मोठा गठ्ठा आणि एका हातात छोटा laptop आम्हाला आमची माहिती विचारत होत्या .प्रथम दर्शनी आम्हाला त्या कुणीतरी प्रचाराला आलेल्याच वाटल्या पण जेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही जनगणनेसाठी आलो त्यांच्या साठी आमच्या घराचे दरवाजे उघडले गेले . इंग्रज भारत सोडून गेले . पण त्यांनी पाडलेल्या  काही पद्धती अजूनही चालू आहे.इंग्रजांच्या काळात  जनगणना करणे हे काम तेव्हा शाळेतल्या शिक्षकाला दिलेले असायचे कारण शिक्षक हा जास्त शिकलेला आणि योग्य रित्या कामाला न्याय देणारा असा होता. पण म्हणून काय भारत सरकारने पण तीच परंपरा पुढे  चालवली  पाहिजे का?  दुपारी  किंवा संध्याकाळी एक शिक्षित व्यक्ती दारोदार फिरून लोकांकडे माहिती मिळवतोय आणि कधी कधी तर त्या घरातली व्यक्ती भेटू शकली नाही तर त्यांना परत दोन तीन चकरा मारून काम पूर्ण करावे लागते. काही शिक्षिकांना तर घरात लहान मुल ठेवून फिरावे लागते कुठे कुठे तर त्यांना  अपमानास्पद वागणूक सुद्धा लोकांकडूनच  दिली जाते. हे मनाला पटतच नाही.  हे काम शिक्षकानेच करावे का?  . भारतात खूप सुशिक्षित  बेरोजगार  आहेत . ते सध्याच्या परिस्थितीत पडेल ते काम करायला तयार असतात. पण त्यांना काम मिळत नाही खूप असह्य अवस्थेतले  हे तरुण कधी चुकीच्या मार्गालाही जातात. आत्महत्या करतात. अश्या माणसांना रोजगार मिळवून देणे सरकारला सहज शक्य आहे. पण हे होत नाही . ही फार मोठी खंत आहे. 

अनघा हिरे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी