श्रावणातले नासिक दर्शन

 



आता तर काय सगळीकडे पाऊस पडला ..सगळीकडे हिरव  गार  झालय  .मन वेड व्हायलाही  वेळ लागत  नाही . त्यात तो रम्य परिसर , उल्हासित वातावरण आणि त्या जोडीला हवी असणारी प्रिय व्यक्तीची साथ ,मग काय विचारायलाच नको . मन उंच उंच आकाशात भरार्या घेत ..सगळ सगळ काही मजेशीर ..पावसाळ्यातले ते औटींग, सहलीचे वातावरण घाटात कुठेतरी गाडी खराब होणे पावसात कुडकुडत ताटकळत उभ राहाणं , आहे ते जेवण उभ्या उभ्या भिजतच  खाणे , भिजलेल्या अंगाने भिजलेली पोळीभाजी खाणे, ओल्या हाताने भेळभत्ता  चाटत  खाणे याची मजा काही औरच.आणि हे येव्हड  सगळ झाल्यावर खायला काहीही न उरणे जवळपास एकही हॉटेल न सापडणे आणि अचानक पिशवीत एखादा टोमॅटो सापडणे त्या एका छोट्या टोमॅटोवर सगळ्याचं तुटून पडणे ह्याच श्रावणातल्या काही मजा आम्ही अनुभवल्या काही जीवावर बेतलेल्या ,काही खूप काही शिकवून गेलेल्या, वेळेप्रसंगी स्वार्थी बनलेल्या तर वेळ आल्यावर औदार्य म्हणजे हरिश्चंद्रा  नंतर आपणच खूप  काही दिलंय मला  श्रावणाने,सुंदर आठवणी त्रागा, अश्रू, घालमेल , खूप खूप काही . मला शेअर करायच्य हे सगळ तुमच्याबरोबर..नासिकला  श्रावणात फिरण्याचे खूप सारे ठिकाण आहेत त्यातले फेमस असो अगर नसो सदाबहार श्रावणात तर सारी सृष्टीच नटलेली असते मग कुठूनही आणि कसेही तिचे सौंदर्य न्याहाळावे .. त्रंबकेश्वर   ,दुगारवाडीचा धबधबा  , सोमेश्वरचा धबधबा  , जव्हारघाट, गंगापूर धारण , तोरंगण.. ईत्यादी 
नाशिकपासून सुमारे २८ कि.मी अंतरावर त्रंबकेश्वर गाव आहे त्राम्बाकेश्वारला  महादेवाचे मंदिर आहे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतोर्लिंग म्हणून त्रंबकेश्वर प्रसिद्ध आहे या त्रंबकेश्वर मंदिरात श्रावणात भक्तांची अफाट गर्दी असते .दर्शनासाठी अगदी लाईन लाऊन उभे राहिले तरी कमीतकमी  ४ते ५ तासात आपला दर्शनासाठी नंबर लागतो ...हं काही लोक वशिल्यानेपुजार्याला लाच देऊन दक्षिण दरवाज्याने प्रवेश करून आपला प्रथम नंबर लावतात .....आणि त्या वेळेस तासंतास  लाईन मध्ये ताटकळत उभ्या असणार्यांना सरळ ढकलून ह्या महारथींचा नंबर लावला जातो... पण आपले बरेच भाविक हे लाईन मध्ये उभे राहून प्रतीक्षा करूनच दर्शन घेतात .पण फार मजा येते ह या लाईन मध्ये उभे राहायला एका सुरात बमबम भोलेला जप चालू असतो ,,,,ॐ नाम्हो नमः , आणि विविध भजने हे लाईन मध्ये उभे असणार्याचे करमणुकीचे ,देवाच्या स्मरणाचे काम चालू असते...एकदम एनार्जीक , भन्नाट वातावरण असते ते! मधेच एखादा नेता त्याच्या चाम्च्यांसह येतो आणि पूर्ण लाईन डिस्टर्ब करून जातो ...असो.. थोडक्यात काय तर ह्या छोट्याश्या कारणाने डिस्टर्ब होणारे हे आमचे भाविक नाही, 
श्रावणाच्या दर सोमवारी त्राम्बाकेश्वरच्या   पूर्ण डोंगराला फेरी मारणे हा अजून एक उत्साही प्रकार आहे . ती २१ कि.मी. आणि ४० कि.मी. अंतराची असते हि फेरी रविवारी रात्री चालू होते रात्रभर भाविक चिखल,काटे दगड जंगल तुडवून  पुढे पुढे जात असतात .न घाबरता ,न रडता .बाम बाम  बोलेच्या जपात पूर्ण आसमंत गुंजत असते .अस म्हणतात कि त्या रस्त्यावर स्वयं शिवशंबू भाविकांना मदत करायला आलेले असतात ..
त्रंबकेश्वरचेच  कुशावर्त नामक  एक ठिकाण आहे. येथे स्वयंभू गोदावरीचा उगम झालेला आहे .आणि येथे सतत पाणी असतेच.
ही झाली सर्व देव धर्माची बाजू .  श्रावणातला त्राम्बाकेश्वरचा  जायचा रस्ता ईतका रम्य आहे की येथल्या सौंदर्यात आपण नक्कीच हरवून जातो रस्त्याच्या दोन्हीबाजुच्या हिरव्या गार डोंगररांगा ... वा! डोंगरावरून वाहणारे झरे, धबधबे  हे तर त्या त्या डोंगरांचे  खरे सौंदर्य  आहे . त्रांबाकेश्वर्च्या  अलीकडे अन्जेनेरीचा डोंगर आहे .त्या डोंगराच्या अलीकडे डाव्या बाजूला हमखास गाडी थांबवायचीच आणि तिथे डोंगराचे निरीक्षण करायचे त्या एका ठिकाणी चक्क उलटा धबधबा वाहताना दिसतो भला मोठा कारंजा म्हणू शकतो  त्याला .पण नाही तो उलटा धबधबाच आहे.. ही खरच निसर्गाची कमालच आहे ..पुढे नैसर्गिक तळे. अंगावर आलेले ढग अप्रतिम!
त्राम्बाकेश्वरच्या  रस्त्याने जाताना उजव्या आणि डाव्या बाजूला छोटे छोटे  कच्चे रस्ते लागतात ते थेट काही कोकणी गावाकडे जातात .अतिशय रम्य वातावरण .उजाड माळरान ,मैलोंमैल गेल्यानंतर क्वचित एखादा दिसणारा मनुष्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वच्ह  सुंदर रस्ते पक्ष्यांचे मंजुळ आवाज आणि भरगच्च वेढलेले गाव , येथे लहान मुलं सुद्धा मुक्तपणे हिंडत असतात . त्या रस्त्याने जाताना हमखास वाटते येथे एक तरी आपली छोटीशी झोपडी असावी आणि आपण पण येथे कायमच येऊन राहावं  ..
त्राम्बाकेश्वारला जाण्यापूर्वी अंजेनेरीचा डोंगर आहे ट्रेकर्सचा एक आवडता स्पॉट म्हणजे हा अंजेरीचाडोंगर , अंजेनेरीची माहिती आणि साक्षात धर्तीवर अवतरलेला स्वर्ग म्हणजे जव्हार घाट , श्रावणाच्या निमित्ताने ह्या सर्व ठिकाणांची मजा लुटणारे  आम्ही नासिककर ह्या विषयी आमच्या पुढच्या लेखात जरूर वाचा .

अनघा हिरे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी