थांब थांब रे मेघा


थांब थांब रे मेघा

जाऊ नको दूर दूर

आता येणार उन्हाळा
मनी माझ्या हूर हूर

माझ्या पायी पसरली
उसळती जाळ निखारे
तग मग त्या जीवाची
कशी करती पाखरे

रखरखती जमीन
नदी नाही हासत
गाई गुरे जमा होती
कुठे हे झरे आटत

उसळतील बघ
नभ पेटती वारे
दाही दिशा पेटल्या
गरम निखारे

झाड झाड मोहरले
आली नविन पालवी
लागली चैत्राची चाहूल
शोधी नविन सावली

नको नको जाऊ मेघा
थांब अजून थोडा
रखरखत्या उन्हा
जीव झाला थोडाथोडा.

(अनघा हिरे )

************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी