काय बोलायचे बोलून टाक


वेळ फार थोडा आहे माझ्याकडे 
काय बोलायचे बोलून टाक
मनात टोचणारी सल
एकदा तरी सांगून टाक 

कधी ठेवल्या असशील अपेक्षा 
अपेक्षांचे ओझे उतरून टाक 
धरले गृहीत कायम आता 
विचारूनही बघत जा 
चुका माझ्याही असतील 
केल्या माफ 
आता त्या सर्व सांगून टाक 

प्रेम करतही असशील माझ्यावर 
आता तरी बोलून टाक 
खूप प्रेम करतो मी
तुझ्याशिवाय राहू शकत नाही 
खोट खोट का होईना
एकदा तरी बोलून टाक 

शेवटच्या ह्या माझ्या क्षणांना
काळजीचा हा हात तुझा 
एकदा तरी फिरवून टाक 
गुंतले मी ह्या मोहपाशात 
सांभाळशील हे सारे सांगून
मोकळे करून टाक 

तुझ्या प्रेमाचा आधार 
आयुष्यभर शोधात राहिले 
ह्या अपूर्ण अतृप्तीतच 
मिटतील डोळे 
अखेरचे मला शोधशील का? 
वेळ फार थोडा आहे माझ्याकडे................

(अनघा हिरे)  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी