फिरुनी नवी जन्मेन मी

 दिवस सुरू झाला की मी गाणे लावते. पहिलं गाणं असत माणसाने माणसाशी माणसासम वागणे.

एकीकडे काम चालू असते. खूपदा मनात हेच येत की मी सगळ्यांशी चांगल वागते. मला खूप लोक चांगले भेटले जे सतत मला मदत करायला तयार असतात. ज्यांना माझी खूप प्रगती झालेली पहायची आहे. आणि ते हर एक प्रकारे माझी मदत करत असतात. पण एक टक्का खराब, स्वार्थी, भामटे,लालची माणसे भेटतात.
चांगल्या लोकांविषयी विचार केला तर मन आपोआप उत्साही होते. चेहऱ्यावर एक आनंद, मनाचे समाधान आणि त्या लोकांसाठी खूपसाऱ्या दुवा माझे मन मागतेच.
त्रासदायक व्यक्ती विषयी मनात एकच विचार येतो. की ही व्यक्ती आपल्या आयुष्यात फक्त त्रास द्यायला आली नाही तर आपल्याला खूप काही शिकवून गेली.
पुढचा बराच वेळ कदाचित ऑफिसला जाईपर्यंत डोक्यात हेच विचार घोळत असतात.
ऑफिसला आले की एकीकडे लॅपटॉप चालू करायचा आणि गुलजारच्या गझल लावायच्या. पहिलं गाणं तुझसे नाराज नही जिंदगी हैराण हू
का नाराज नसावं मी जिंदगी वर? का हैराण होऊन तटस्थपणे बघत राहू.
भरल्या डोळ्यांनी काम करत राहावं. केबिनच्या डोअरला नॉक झाले की आधी डोळ्याच्या कडा हलकेच भिरकवायच्या आणि हसतच स्मोरच्याशी बोलायचे.
पुन्हा आपल्या कामाला लागायचे हात आणि डोक लॅपटॉप पाशी आणि मन भरकटते स्वैर होऊन, उदास आणि निश्चल होऊन.
काम चालूच असते सगळ्यांचे आपापल्या ठिकाणी मध्येच हात थांबतात. मोबाईल मध्ये फोटो बघायला सूरवात करायला. मन सुध्दा आता मी करत असलेले काम आवडीने बघायला येते. माझ्या कामात सहभागी होते. स्वतः चे खूप काही अनुभव, दुःख, यातना सांगत असते.
इकडे गाण्याची ओळ चालू असते
वक़्त के सितम, कम हसीं नहीं
आज हैं यहाँ, कल कहीं नहीं
वक़्त से परे अगर, मिल गये कहीं
मेरी आवाज़ ही ...
पुन्हा मन हेलावत आणि विचारात गर्क होते. का वेळ सुध्दा माझी नव्हती. हातातून खूप गोष्टी कश्या काय सटकून गेल्या. तो क्षण मी आणु शकते का परत? त्या क्षणात जाऊन मी सर्व ठीक करू शकते का?
तितक्यात
जहाँ से तुम मोड़ मुड़ गये थे
ये मोड़ अब भी वहीं पड़े हैं....
गुलजार यांच्या शब्दातली आळवणी एकु येते.
खरं तर आहे. थांबलय ना त्या वळणावरती माझे आयुष्य. पुढे जायला नाही म्हणतय.
दिवस संपत जातो, विचार चक्र हे असेच चालू असतात.
शेवटी एक गाणे वाजते
एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी
स्वप्नाप्रमाणे भासेल सारे जातील साऱ्या लयाला व्यथा भवती सुखाचे स्वर्गीय वारे नाही उदासी ना आर्तता ना बंधने वा नाही गुलामी भीती अनामी विसरेन मी हरवेन मी, हरपेन मी तरीही मला लाभेन मी
आशा उद्याच्या डोळ्यांत माझ्या फुलतील कोमेजल्या वाचूनी माझ्या मनीचे गूज घ्या जाणूनी या वाहणाऱ्या गाण्यातुनी लहरेन मी, बहरेन मी शिशिरातुनी उगवेन मी
तो पूर्ण दिवस असतो अतुलच्या अनघाचा आता घरी जायची वेळ झाली, आता पुढचा दिवस आहे तो अतूलच्या पिल्लांचा... आता त्यांच्या पंखात बळ भरण्यासाठी मी फिरुनी पुन्हा जन्मेन मी हे गाणे गुणगुणत ऑफिस बाहेर पडते. आता मन सुध्दा माझ्या बरोबर असते मुलींसाठी भरारी घ्यायला....
अनघा हिरे
नासिक
May be an image of jewellery

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा