तुझ्या माझ्या भेटीची जागा मी शोधलीय.

त्या समुद्रात...
जेव्हा लाटांना उधाण आले असेल,
वादळी वारा सुटला असेल,
जो तयार असेल सर्व नेस्तनाबूत करायला.
चल ये तेव्हा नक्की बघायला, कुणाची ताकद जास्त आहे, त्याची की माझी?
आठवणींचे वादळ माझ्याकडेही आहे.
आणि
स्वतःला नेस्तनाबूत करण्याची शक्तीही.
तू फक्त पाहिला आहे त्याचा आणि माझा शांत, शीतल सहारा.
आता आमच्यातले हे वादळ पण अनुभवून बघ.
तू येशील नक्की
हे ताकदीचे दंद्व पहायला...
अनघा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी