तो होताच वेगळा, अगदी जगा वेगळा भाग 2


त्या दिवसाच्या अपघातानंतर माझे आयुष्य पूर्ण बदलले होते.
हुरहुर लागली होती. काही जवळ आहे की खूप काही हरवलं अशी अवस्था होती.
माझे मन त्या अनोळखी माणसासाठी सैरभैर धावत होते. काहीतरी शोधत होते.
मनाच्या यातना इतक्या होत्या की शरीराच्या होणाऱ्या यातनांकडे लक्ष जात नव्हते.
मनापासून माझे हृदय त्या अनोळखी व्यक्तीस हाक घालत होते.
प्रेमात पडल्याचे हे भले मोठे लक्षण होते. पण मी काहीही करू शकत नव्हते.खूप गोष्टी शक्य असूनही मला त्या बोलावयास जमल्या नव्हत्या. अनेक गोष्टी हातात येता येता सुटून गेल्या होत्या.
परत मिळतील की नाही काही कल्पना नव्हत्या.
हताश मनाने माझे रोजचे काम सुरू झाले होते.
घर कॉलेज आणि कॉलेज घर . बस हेच काय ते जगणे होते का? किती निरस आणि लांबलचक आयुष्य झाले होते.
अचानक तो पुन्हा एकदा समोर आला. मन आनंदाने भरून गेले. मनाशी पूर्ण ठरवले ज्या चुका केल्या त्या नाही करायच्या. आता तो समोर आला तर त्याचे नाव पत्ता फोननंबर सर्व सर्व विचारायचे. ह्या आठ दिवस माझ्या मनानी भोगलेल्या यातना परत भोगायाच्या नाही. आता याला सोडायचं नाही.
शेक हॅण्ड साठी त्याने पुढे केलेला हात मी किती आघाश्या सारखा धरायला गेले होते.
काही समजल असेल का त्याला त्या स्पर्शात. तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल. मला घेणं नव्हत त्या सगळ्या गोष्टींशी.
'मी अतुल ' अस तो म्हटल्या बरोबर मी त्याला सॉरी बोलले.
त्या दिवशी खूपच रूढ होऊन बोलली मी तुमच्याशी सॉरी.
काही हरकत नाही चूक माझीच तर होती.
खूप वेळानंतर भानावर येऊन मी त्याचा हात सोडला.
तसा तो लगेच बोलला चल आपण कुठेतरी चहा घेऊ.
मी खूप निरागस पणे माझा हात अर्धवट मुडपून पाठीमागे बोट दाखवत बोलले कॉलेज कॅन्टीनला जायचं का?
नको चल पुढे विवा फास्ट फूड आहे तिथे जाऊ निवांत आहे ती जागा.
कुठलीही भीती न बाळगता तो अनोळखी नसलेला अतुल त्याच्यासोबत मी निघाले.
कितीतरी वेळ आम्ही दोघे गप्पा मारत बसलो.
रोज हे असच व्हायला लागलं होत. मी आणि तो दीवसों दिवस जवळ येत गेलो.
राममंदिर, सोमेश्वर, गंगाघाट त्रांबकेश्वर, नाशिक मध्ये असतील नसतील ते सर्व ठिकाण आम्ही प्रेमी जोडप्यांनी पालथे घातले होते.
माझ्या केसांशी खेळता खेळता तो खूप साऱ्या गोष्टी बोलायचा. नातेवाईक, मित्र त्याच्या कॉलेजचे किस्से. बालपणीचे किस्से.
अतुल लहान पणापासून आत्ता पर्यंत जगलेला एक एक क्षण मला सांगत होता. अतुल काय आहे हे मला हळू हळू उलगडायला लागले. तसा तो मला खूपच आवडू लागला.
गप्पा मारताना एकदा मी खूप सहज अतुलला विचारले
"अतुल तू कधी जोरात पडला का रे?"
हो ना यार असा पडलो,अशी दुखापत झाली की बस.
"मग काय केले रे?"
काही नाही मीच मला सावरलं आणि मार्ग शोधला.
"हो? काय रे कधी पडला?"
त्या एके दिवशी एक मुलगी माझ्या समोर रडत आणि रगारागात बोलत होती, तेव्हा ती बोलत असताना प्रत्येक शब्दाला तिच्या गालावर खड्डे पडत होते. मी त्या दिवशीच त्या खड्यात पडलो.
अच्छा तर म्हणजे मी ते आठ दिवस उदासवाने घालवले तसे दिवस ह्याने सुध्दा घालवले असणार.
हेच असच असत ना पहिल्या नजरेतल प्रेम. जे आम्हा दोघांना एकाच वेळी झाले होते. प्रेमाची तीव्रता दोघांकडे सारखी होत, आणि भेटीची आतुरता ही सुध्दा तितकीच उत्कट होती.
माझ्याघरी माझ्या लग्नाच्या हालचाली चालू होत्या
एक दिवस मी अतुलला सांगितलं माझ्या घरात सगळे लग्नाला फोर्स करतायेत. आणि रोज कुणा कुणाचे पत्र येतच आहे. तो बोलला चल त्रांबाकेश्वर ला जाऊन लग्न करू.
काहीतरीच काय पळून जाऊन कशाला करायचं? तयार करू की घरच्यांना. माझ्या घरचे माझे ऐकतील.
पण मुख्य प्रश्न त्याला हा वाटतं होता की आमच्या दोघांची जात जरी एक असली तरी आमची पोट जात वेगळी होती. आमच्या दोघांच्या जातीत रोटी बेटी हा व्यवहार करत नाही अस त्याला वाटायचं.
यावर त्यानेच एक उपाय शोधून काढला. आमच्या जातीच्या पुढाऱ्यांना आम्ही दोघे जाऊन भेटलो. रामदास जाधव काका हे आम्हाला दोघांना छान ओळखत होते. काकांना आम्ही सर्व हकीकत सांगितली. मग काका आमच्या मदतीला धाऊन आले.
काका पहिले माझ्या वडिलांकडे आले आणि त्यांनी अतुल चे स्थळ बाबांना सांगितले. नंतर अतुलच्या घरी जाऊन माझ्या स्थळा विषयी सांगितले.
माझे बाबा रीतसर त्यांच्या घरी गेले माझ्या विषयी बोलायला. तर तिकडून सरळ नकार आला. आम्हाला नासिक मधली मुलगी करायची नाही. आम्हाला बाहेर गावची मुलगी करायची आहे. आमच्या घरातले पहिले लग्न आहे आम्हाला बाहेर जाऊन लग्न करण्याची ईच्छा आहे.
माझे वडील तसेच रिकाम्या हाती परत आले. काय झाले म्हणून उत्सुकतेने मी वडिलांना विचारू शकत नव्हती. कारण मला काही माहीतच नव्हते ना. तरीही आई बाबांचे बोलणे मी कान देऊन ऐकू लागली.
अतुल चे आता मत पक्के झाले की आपण बाहेर मंदिरात जाऊन लग्न करायचे.
अतुल तू का नाही बोलत घरी ? विषय काढून तर बघ.
नाही ना कुणाला खरं ही वाटणार नाही मी प्रेमात पडू शकतो.
अतुल नुसता घाबरून आणि कुणाला दुखवायचं नाही म्हणून ह्या गोष्टीत माघार घेत होता पण मला सोडण्याचा विचार तो कदापीही करू शकत नसल्याने रोज रोज नवी शक्कल लढवायला लागला.
आमच्या रामदास काकांचा घरच्या आणि रामदास काकांच्या अतूलच्या घरच्या फेऱ्या वाढू लागल्या.
मग अतुलने त्याचे चुलत भाऊ बाळा दादा आणि अशोक दादा ह्याची मदत घेतली. माझी आणि दादांची भेट इंदिरानगरला घडवून आणली. दोन्ही दादा जाम खुश झाले. दोन्ही दादा मग अतूलच्या मदतीला धाऊन आले. तरीही काम बनेना.
इतनी शिद्दत से मैंने तुम्हे पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है.
असच काहीस आमच्या बाबतीत घडलं.
एकेदिवशी एका कार्यक्रमा निमित्त अण्णा हजारे, ग. प्र प्रधान, मेधा पाटकर, अविनाश धर्माधिकारी नासिकला आले होते. त्याच्या राहण्याची सोय आमच्या घरी झालेली होती. दुसऱ्या दिवशी सर्व पेपर मध्ये या बातम्या झळकल्या. ही मंडळी नासिकला आलेले आणि त्यांचा मुक्कामाची सोय नसिकचे सामाजिक कार्यकर्ते शांताराम चव्हाण यांच्या घरी आहे. ह्या बातम्यांनी काय काम करायचे ते केले. आणि दुसऱ्या दिवशीच अतूलचे वडील रामदास काकांबरोबर आमच्या घरी हजर. आता त्यांचे म्हणणे होते की पूर्वी आमची ईच्छा होती बाहेर गावची मुलगी करायची पण आता आम्ही आमच्या मुलाचे स्थळ घेऊन आलोय. अतूलच्या वडिलांनी हे शब्द घरात बोलले आणि जेव्हा माझे बाबा पण ह्या गोष्टीला तयार झाले तेव्हा मी आणि रामदास काकांनी एकदमच सुटकेचा निःश्वास टाकला.
तिथून पुढे मला रीतसर बघायला येण्याचा कार्यक्रम झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी