जगजितसिंग माझे मन गाण्यातून गाऊन दाखवतोय.

 निर्विकार बनून मी जगजितसिंग ला कधीच ऐकू शकत नाही.

अस वाटतं जगजितसिंग फक्त माझे मन गाण्यातून गाऊन दाखवतोय.
सदमा तो है मुझे भी की तुझसे जुदा हु मै...
बिखरा पड़ा है तेरे ही घर में तेरा वजूद
बेकार महफ़िलों में तुझे ढूँडता हूँ मैं
हे खरंच अस का होत.. जीव लावलेली व्यक्ती आपल्या जवळ नसणे किती खोलवर जखम करणारे दु:ख आहे हे.आणि सर्वात मोठं म्हणजे वाट बघणे.
हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले........
....बहुत बे-आबरू होकर तेरे कोचे से हम निकले.
कुणी असही कोणाच्या दारा समोरून बेअब्रू होऊन निघत असेल का? मग एव्हढ बेअब्रू होई पर्यंत ही व्यक्ती प्रेम करत बसलीच कशी? समोरच्याला आपल प्रेम उघड करू शकली नाही की ते प्रेम समोरच्याला समजले नाही?
मिर्झा गालिब ला खूप काही सांगायचे होते यातून. खूप गुपिते उघड करायचे होते.हे मात्र नक्की. प्रेमात जगण्यात आणि मरण्यात काही फरकच नाहीये. प्रेम जगत असताना ती व्यक्ती किती मरण मरत असते तिचे तिलाच माहिती आहे.
हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं छोड़ा करते
वक़्त की शाख़ से लम्हें नहीं तोड़ा करते.........
तूने आवाज़ नहीं दी कभी मुड़कर वरना
हम कई सदियाँ तुझे घूम के देखा करते.
गुलजार यांची गझल, पिंजर सिनेमात वापरली आहे. ही गझल ऐकताना माणूस आतून हालून जातो. काय एक एक शब्दात अर्थ आहे. तेव्हढच किती आर्तता, जबरदस्त.
गुलजार यांचेच अजून एक गीत मुळापासून हालवून टाकते
चिट्ठी ना कोई सन्देश
जाने वो कौन सा देश
जहाँ तुम चले गए
इस दिल पे लगा के ठेस
जाने वो...
हे गाणे लागले की मला माझे मन नेहेमी त्याच क्षणात घेऊन जाते . ज्या क्षणाने मला उध्वस्त केले.
एक आह भरी होगी
हमने ना सुनी होगी
जाते जाते तुमने
आवाज़ तो दी होगी
हर वक़्त यही है गम
उस वक़्त कहाँ थे हम
कहाँ तुम चले गए
हे असच झालेले आहे. त्या क्षणाला माझ्या प्रियाने माझी आठवण काढलीच असणार, आणि तिथे मी नव्हती त्याला वाचवायला.
एकंदर काय आयुष्य सोपे राहिले नाही एव्हढेच.
शेवटी हेच म्हणावे लागेल गम का खजाना तेरा भी है मेरा भी
बेनाम-सा ये दर्द ठहर क्यों नहीं जाता
जो बीत गया है वो गुज़र क्यों नहीं जाता....
अनघा...
नेहेमीच आनंदी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी