गॅदरींग


 शाळा कॉलेजमध्ये असताना गॅदरींगचे फार अप्रूप होते.आता वर्गातल्या सर्व मुलांना गॅदरींग मध्ये भाग घेता येतो तस पूर्वी आमच्या वेळेस नव्हते. बाईंच्या फेवरेट विद्यार्थिनींना हा चान्स मिळत. सुदैवाने मी बाईंची आवडती विद्यार्थिनी असल्यामुळे अनेक वर्षे शाळेच्या गॅदरींगमध्ये भाग घेता येत होता. बऱ्याचदा मेनरोल करायला मिळाला .

गोल चेहरा असल्यामुळे आणि गोसावी बाईंची खूप आवडती असल्यामुळे त्यांनी मला नववीला असतांना गांधीजी ही मुख्य भूमिका साकारायला लावली. वयात आलेली मी गांधीजींची भूमिका करणे म्हणजे तो पोशाख करणे मला खूप लाजिरवाणे झाले होते. पण बाईंना नाही कस म्हणायचं आणि शिवाय मुख्य भूमिका...
झालं तर मग , गांधीजी मी होणार होती. घरात सांगितलं मला नाटकात घेतलं गांधीजी होणार. बस लगेचच ताईने चिडवायला सुरवात केली आणि मी खूप ओशाळली. रोजच चिडवन मला काही केल्या सहन होईना. मग मी नाटकात भाग घ्यायचा नाही असं ठरवलं पण बाईंना नकार कळवन नाही जमलं मला.मग रोजरोजच्या चिडवण्यावर मी उपाय शोधला मी घरात खोटंच सांगितलं आमचं नाटक रद्द झालं.
बघू पुढे काय करायचं असा विचार करत मी वेळ मारून नेली.
आता शाळेत बाईंनी अजून एक बॉम्ब फोडला की मला नुसतं धोतर आणि अंगावर पंचा गुंडाळून पूर्ण नाटकात राहायचे आहे. बस आता खरी मजा आली . वरती नुसता पंचा गुंडाळायचा.
बापरे! कसं शक्य आहे ते. नुसती मुलींची शाळा जरी असली म्हणून काय झाले स्वतःच्या मनातली ती लाज ती बाईं समोरही लपली नाही. बाईंनी मला धमकी वजा विनवणी केली, " हे बघ चव्हाण, सर्व तयारी झालीय,आपलं नाटक बघायला बाहेरचे पाहुणे येणार आहेत. मला जसा हवा तसाच पोषख तुला करावा लागणार आहे" मला लाज वाटत होतीच तितकी भीती ह्या गोष्टीची होती की हा पेहराव करायला घरचे नाही म्हणतील. मग उद्यावर येऊन पडलेलं नाटक नाही म्हटलं तर बाईंची फजिती होईल. घरी काहीच सांगितलं नाही. आमच्या वाड्या समोर एक शांता मावशी राहायच्या त्यांच्या मिस्टरांचे धोतर घेऊन आली आणि ते गुपचूप दप्तरात ठेवले.बाईंनी डोक्याला लावायला फुगा सांगितला होता आणि एक तारेचा चष्मा सुद्धा सांगितला. आता इथे माझी पंचाईत झाली कारण डोक्याचा तो टकलाचा फुगा आणि तारेचा चष्मा भाड्याने घ्यायला माझ्याकडे काही पैसे नव्हते. मग मी बाबांची एक चॉकलेटी रंगाची टोपी फाडून गोल करून घेतला माझं हे टक्कल जरा जास्तच डार्क झालं पण पर्याय नव्हता. घरात एक तार होती त्याचा गोल चष्मा बनवला. चष्मा खूप सुंदर झाला होता. अंगावर गुंडाळायचा पंचा बाई आणणार होत्या.बाई उद्या एक चरखा आणि खरी खुरी बकरी सुद्धा आणणार होत्या. सर्व तयारी जबरदस्त झाली होती पण घरातल्यांच्या नजरे पासून दूर.
घरात अशीही मी खुड खुड करत असायची त्यामुळे मी माझी माझी काहीतरी खेळतेय असं समजून कुणाचं लक्ष माझ्याकडे गेलं नाही.फक्त आई सोडून.
आईने मला सर्व समानासह रंगे हात पकडले पन आईला तयार करणे खूप सोपे होते. ताईच्या चिडवण्या नंतर आई जवळच खूप रडली होती त्यामुळे आईला जणू माझ्या ह्या लबाडीची पुसटशी कल्पना होतीच.
दुसऱ्या दिवशी माझी खरी परीक्षा होती.बाईंनी मला खूप छान तयार केले शरीराचा वरचा भाग उघडा राहणार नाही याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली.पाहुणे जेव्हा मला भेटायला आले तेव्हा बाईंनी मी तयार केलेल्या चष्मा आणि टकलाची खूप तारीफ केली होती.
त्या नाटकासाठी आमच्या वर्गाला बक्षीस मिळाले. गोसावीबाईंच्या अतिउत्साहा मुळेच हे शक्य झाले होते. बक्षीस मिळाल्या नंतर आईने घरात गोप्यस्फोट केला मग नंतर माझे घरात खूप कौतुक झाले. माझ्या बक्षीस मिळवण्याच्या आनंदाला खरा खुरा आनंद झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी