डिप्रेशन रिकाम्या मनाचे चाळे

 

मी नेहेमी विचार करते की डिप्रेशन हे खरोखर रिकामटेकड्या माणसाचं काम आहे. मला डिप्रेशन साठी अजिबात वेळ नाहीये. आयुष्य खूप छोटे आहे आणि ह्या कमी अवधीत मला खूप सारे काम करायचे आहे.

स्वता:ला कायम कामात व्यस्त ठेवणे हे मी मुद्दाम स्वीकारलेली जीवन शैली आहे. माझ्या आयुष्यात दुःख आले. त्या दुःखांनी मला मुळासकट हलवून टाकलं. परंतु ते मला मुळासकट उध्वस्त करू शकले नाही.
इतरांसारखा मी सुध्दा हा विचार केलेला आहे की मी काय चूक केली होती की माझ्या वाट्याला हे सर्व आले. किंवा आता माझ्या आयुष्यात जगण्या सारखं काय राहील आहे. मी का जगतेय. किंवा माझ्या ह्या जबाबदाऱ्या कधी संपतील माझ्या मुली कधी सेटल होतील. त्या सेटल झाल्या की मला अजिबात जगायचं नाही. वैगरे खूप विचार डोक्यात येऊन गेले.
परंतु जेव्हा मी आजूबाजूला सर्व तटस्थपणे बघायला सुरूवात केली तेव्हा मला खूप नव्या चॅलेंजला समोर जावे लागले. मला उगाच वाटायला लागले की कदाचीत माझ्या हातून खूप चांगल्या गोष्टी घडणार असतील म्हणून मी जगतेय. माझ्या मुळे 15 कुटुंबाला पगार मिळतोय तर इथे थांबायचं नाही 1000 लोकांना रोजगार मिळेल असे आपण काही केले पाहिजे.
बिझनेस मध्ये खूप झोकून घेतले. बिझनेस नशा बनली. त्यामुळे जीवनसाथी गेल्यामुळे बरेच लोक कुठल्या तरी नशेत राहणं पसंत करतात तशीच मी ही नशा स्वीकारली. नवर्याचे अर्धवट राहिलेले सर्व स्वप्न पूर्ण करायला घेतले. त्यासाठी मोठी बकेट लिस्ट बनवली. त्याची आणि माझी मिळून भली मोठी लिस्ट तयार झालेली आहे. त्यामुळे वेळ थोडा आणि काम जास्त अशी अवस्था तयार झाली आहे. ह्यात कुठे वेळ आहे स्वतःच्या डिप्रेशन चे लाड पुरवायला.
मी डिप्रेशनला जवळ फिरकू दिले नाही. आणि आले तरी मी स्वतः स्वतःलाच बजावून सांगते, हे दुःख कवटाळून बसायचं नाही. ह्याचे लाड नाही करायचे. ये बाबा दोन दिवस रहा आणि निघून जा. कारण माझे मन हे तुझे घर नाही. ते माझ्या मुलांचे आहे. त्यांच्या पंखात बळ भरण्यासाठी तू इथे थांबायचं नाही.
मी जगण्याच्या पद्धती बदलल्या. नवऱ्याला आवडत होते मी नीटनेटकी फॅशनेबल राहिलेली. मी तशीच राहते. माझ्यात मी बदल केले.
नवर्याबरोबर केलेली मजा मस्ती आठवून मी आनंदी होते. त्या गोष्टीचा उगाच बाऊ करून, तेव्हा मी किती छान लाईफ जगली आणि आता हे काय लाईफ जगतेय असा विचार करून उगाच दुःखी होत नाही.
जास्तीत जास्त रिकामा वेळ फक्त फ्रेंड्स सोबत घालवते. आणि जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा माझ्या सारख्या असंख्य लोकांचे कौन्सिलींग करते.
मोटिवेशन करणारे चांगले ग्रुप जॉईन केले.
मी बघितलं डिप्रेशन ही फार मोठी आणि घाणेरडी दलदल आहे. ह्यात जर मनुष्य अडकला तर तो फसतच जातो. त्यामुळे स्वतःचे डोके शाबूत ठेवून वेळीच त्यातून बाहेर पडावे. तेही स्वतःचे स्वतःच.
आपण स्वतः आपले चांगले मित्र असतो आणि बेक्कार दुश्मन सुध्दा.
आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा कधीच निगेटिव्ह विचार सरणीच्या लोकांमध्ये फिरकू नका. ते आपल्याला सांभाळू शकत नाही उलट तोडायचे काम मात्र पटकन करतात. आणि स्वतः मध्ये आत्मविश्वास असेल तर कोणतेही काम लोकांनी कितीही विरोध केला तरी देखील ते काम करायचेच असे असंख्य च लावलेले वाक्य समोर हवेच.
इथे जे जन्माला आलेले आहेत ते सगळे कधी ना कधी मरणार आहेत. प्रत्येकाच्या जाण्याच्या वेळा वेगवेगळ्या. काहींची साथ आपल्या आयुष्यात थोड्याच दिवसांसाठी असते. खूप काळ बरोबर राहणाऱ्या व्यक्ती विषयी सुध्दा कधी जिव्हाळा निर्माण होत नाही. तर कधी प्रवासात थोड्या अवधीसाठी भेटलेला व्यक्ती सुध्दा आयुष्यभर लक्षात राहतो.
खूप पॉझिटिव पणे जगाकडे बघा. जग खूप सुंदर आहे. भूतकाळ हा भूतकाळ आहे तो भविष्य बनून कधीच समोर येणार नाही. हे लक्षात ठेवा. भूतकाळाच्या खुणा भविष्यकाळात शोधू नका. भूतकाळाचा विचार करत भविष्यकाळ बिघडवायला बसत असाल तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच आहात हे लक्षात ठेवा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी