आठवणींच्या वहीतील ते दुमडलेले पानं जरा दुमडलेलेच राहू दे.

उगा उघडल्या जातील त्या काळजावर खोल कोरलेल्या जखमा

आणि वाट मिळेल त्या ओथंबून आलेल्या अश्रूंना, उगा सैरभर धावाया.

त्या दुमडलेल्या पानांवर ठेवले आहेत अनंत युगांचे माझे एकटेपण.

छिन्नभिन झालेली केविलवाणी माझी आळवणी.

अन अजून तिथे आहे तो आठवणींचा विस्तीर्ण किनारा.

त्या विस्तीर्ण किनाऱ्यावर आहेत स्मृतींच्या लाटांची काही नमने.

इथे हर एक लाटांमध्ये बळ आहे बघ त्सुनामीचे.

जे तयार होऊ पाहत आहे नव्या जन्म घेतलेल्या स्वप्नांना उध्वस्त कराया.

ऐक माझं ,
राहू दे त्या पानांची घडी तशीच, कितीही वाटत असेल तुला ओबड-ढोबड
पण हीच माझ्या आयुष्याची ओळख आहे.
***************
नासिक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी