तुझ्या छातीत उमटलेली वेदनेची कळ

अशी कशी रे आली तुझ्याजवळ.
कदाचित ती माझ्यासाठी होती आणि तू तुझ्या अंगावर झेलली अगदी नेहेमी सारखीच.
माझ्या वाटेचे दुःख स्वतःच्या अंगावर ओढून घ्यायचा अगदी तसच .
चुकला रे तू
त्या वेदना माझ्या होत्या तो त्रास माझा होता.
का स्वार्थी झालास तू
मी मात्र भोगतेय त्या अनंत काळ पुरतील अश्या मरण यातना.
तुझ्याशिवाय.….
खर सांग मी सहन करते त्या यातना सहन करण्याची ताकद नव्हती तुझ्यात ना?
की माहीत होते तूला एकाच्याच वाट्याला आलेय हे मरण .
मी मात्र अजूनही जगतेय तुझ्याशिवाय,
कर्तव्य पार पाडण्याचा बुरखा पांघरून अन मृत्यूची वाट बघत.....
निरंतर....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी