मनाला चटका लावून जाणारे लिखाण --

दहावीला असताना एक धडा होता अभ्यासाला.
ऑरफियस आणि युरोडाईज यांचा. दहावीच्या त्या वयात माझ्या मनाला प्रेम काय असते ते समजले, आणि तेव्हाच माझ्या मनाने पक्के केले होते की आयुष्यात प्रेम करावे तर अगदी असेच जीव तोडून.
ऑरफियस आणि युरोडाईज हे दोघे एकमेकांवर नितांत प्रेम करणारे, एकमेकांशिवाय जगू शकत नाही अशी अवस्था असणारे. पण अचानक एके दिवशी युरोडाईजचा साप चावून त्मृत्यू होतो त्यानंतर ऑरफियस वेडापिसा होतो आणि वेडापिसा होऊन तो युरोडाईजला जागोजागी शोधायला लागतो, वेड्यासारखा तिला शोधत शोधत तो स्वर्गात जातो स्वर्गात गेल्यावर देवांना म्हणतो देवा प्लीज मला माझी युरोडाईज परत दे. मी तिच्या शिवाय जगू शांत नाही. तिच्या सहवासा शिवाय राहु शकत नाही. देव पहिले तर त्याला नकारच देतो आणि मग नंतर म्हणतो तुझे प्रेम बघून मी हरलो आणि मी आता तुला तुझी युरोडाईज परत देतो पण माझी एकच अट आहे. तू तुझ्या युरोडाईजला घेऊन जा पण ती तुझ्या सोबत चालत येणार नाही. तू पुढे पुढे जाशील आणि युरोडाईज तुझ्या मागे मागे येईल. पूर्ण रस्ता तू तिच्याशी संवाद करणार नाही आणि भूतलावर पोहोचे पर्यंत , एवढा पूर्ण रस्ता संपेपर्यंत तू एकदा देखील मागे वळून बघणार नाही. तू जेव्हा मागे वळून बघशील तेव्हा त्या क्षणाला युरोडाईज अदृश्य होईल आणि स्वर्गात परत येईल.
एकदा का भूतलावर पोहोचला की मग तुला तुझ्या युरोडाईज बरोबर पूर्ण आयुष्य आनंदात घालवता येईल .
बरं असं म्हणुन तो तिथुन निघतो भूतलावरच्या प्रवासाला. हळूहळू प्रवास करत असतांना तो मनामध्ये त्याच्या आणि युरोडाईजच्या भावी आयुष्या बद्दल खूप स्वप्न सजवत असतो. माझं तिच्यावर किती प्रेम आहे मी तिला सांगणार मी काय करु आणि काय नको असं त्याला झालेलं असत. थोड्याच क्षणात तो भूतलावर पोहोचतो. भूतलावर पोचल्याबरोबर त्याला असे होते की मी कधी माझ्या युरोडाईजला बघेल , कधी तिला मिठीत घेईल. आणि खूप आतुर अवस्थेतच तो जमिनीवर पोहोचल्या क्षणालाच मागे वळून बघतो, की माझी युरोडाईज कुठे आहे आणि कशी आहे. परंतू ऑरफियस आणि युरोडाईजच्या चालण्या मध्ये दोन पावलांचे अंतर असते. तो तर जमिनीवर पोहोचलेला असतो पण युरोडाईज अजून जमिनीवर पोहोचलेलीच नसते ती फक्त आणि फक्त दोन पावलांनी जमिनीवर पोहोचायची बाकी असते. ती जमिनीवर पोहोचू शकलेली नसते आणि हा मागे वळून बघतो त्या क्षणाला युरोडाईज विनवणी वजा खंत व्यक्त करते ओह ऑरफियस, माझं तुझ्यावर किती किती प्रेम आहे. तू हे काय केलंस तू का मागे वळून पाहिलस क्षणातच मी तुझ्याजवळ असते आपण दोघे एकमेकांबरोबर आयुष्य घालवले असते. आता मी तुझ्या बरोबर राहू शकत नाही. आणि क्षणातच युरोडाईज अदृश्य होते.
युरोडाईज गेल्या नंतर ऑरफियसने फोडलेला टाहो, त्याची गगनभेदी किंचाळी आणि शेवटी त्याने केलेला शरीर त्याग सर्वसर्व मनाला त्रास देऊन जातात.
शेवटी चटका लावणारे लिखाण का कोण जाणे हृदयाच्या एका कोपऱ्यात जागा करून बसलेले कायमच, आणि कदाचित आता मला सुद्धा माझ्या स्वतःच्या प्रेमकहाणीत एक चटका लावणारी अवस्था निर्माण झालीय.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी