मी तुझी झाली म्हणून तु ही माझाच असला पाहिजे.

हे बंधन नाही हट्ट होता माझा.
माझ्या प्रेमाला एका कुपीत लपवून ठेवण्याचा.
आवडत मला तुझं बनून जगायला...
तुझ्या आजूबाजूस माझं वास्तव शोधायला....
नाही दिसला मागमूस तर घाबरायला होत, बिथरायला होत, आणि चिडायलाही होत.
आणि सरते शेवटी मग अश्रुंच्याच सानिध्यात त्या गर्क काळ्या अंधाऱ्या, अनामिक भीतीत स्वतःला लोटायला ही होत.
मग तिथेच शोधते एक धागा तुझ्या मायेचा, सहवासाचा
त्या अंधारातून बाहेर यायला.
सहजच जगते मी तुझ्या सोबत हर एक क्षणात सामावून घ्यायला.....
तू असतोस सोबत पण तरीही का वाटते ती अनामिक भीती उद्याची.....
खूप क्षण गमावले,
आता उरलेले क्षण वेचून घे ओंजळीत तुझ्या
दे दान मला त्या क्षणांचे
बघ जमेल तुला,
आपल्या प्रेमासाठी......
अनघा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी