त्या त्रिकोणाचा अर्थ विचारला होता तू मला,

ते सूत्र बित्र नाही माहीत
पण हे सांगू शकते
परिपूर्ण 'मी' म्हणजे त्रिकोण.
एक रेषा म्हणजे माझे कुटुंब म्हणजे माझी जबाबदारी
दुसरी रेषा म्हणजे हा समाज म्हणजे माझे कर्तव्य
आणि तिसरी महत्वाची रेषा म्हणजे तू
तू म्हणजे मन मोकळा श्वास आणि उर भरून ठेवलेला श्वासातील सुगंध,
तू म्हणजे एक मुक्त आभाळ आपल्या सहवासातील एकमेव ठिकाण,
तू आहेस अस्ताव्यस्त स्वैराचार, म्हणजे मुक्त मी आणि माझ्यातला फक्त तू,
तू आहे माझ्या हसण्याचे कारण आणि विरहातील उदासी,
तू म्हणजे सर्व काही त्या दोन रेषांना पूर्ण करणारी ती तिसरी रेष आणि एक परिपूर्ण त्रिकोण,
नाहीतर फक्त आणि फक्त दोन समान रेषा .....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी