आपले प्रेम जेव्हा शेवटचा श्वास घेत होते, कोमेजत होते,

ते मरणा आधी कोमात गेले होते.
बघायचे नव्हते त्याला माझे हाल ह्या उघड्या डोळ्यांनी.
म्हणूनच त्याने मिटून घेतले स्वतःला.
एका गाढ निद्रेत गेला शोधायला तो स्वप्नाचा गाव.
हिंडला, फिरला पूर्ण गाव त्याने धुडळला..
कोरड पडलेल्या घशानेच आवाज देत होता स्वतःला
स्वतःच्या नटखट,अवली, मस्तिखोर, मिश्किल व्यक्तीमत्वाला
कोरड्या घशाने शोधत होता प्रेमाचा ओलावा.
पण नाही.....
तिथे त्याला माझेच काही अवशेष सापडले
छिन्नभिन्न झालेले मन, व्याकुळ आर्जवे, विनवण्यांचे लक्तरे....
मन खूप व्याकुळ झाले त्याचे
तुझा मागमूसही नाही त्या गावी उगाच साद देत राहिला.
सध्या ऐकलंय कोमात गेल्यावर त्याने आत्महत्या केलीय म्हणे...
अनघा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्द बापुडे केवळ वारा

फिरुनी नवी जन्मेन मी