कितीही आनंदाचे क्षण येतील आयुष्यात

परंतु डोळ्याची एक पापणी

कायम विरह आणि गतस्मृतीच्या

रोमांचित क्षणांनी ओली होणारच का?

सुखात जगत असतांना

दुःखाने तयार झालेली
पोकळी सलणार आहेच का मनात?

वाटतं एकटंच सैराभैर पळत सुटावं,

त्या आठवणींच्या वाटेने शोध घेत,

निसटलेल्या क्षणांचा आणि तुझा देखील......

तुझीच

टिप्पण्या