नव वर्षानंतरचा पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत सण जवळ आला की नेहेमी आनंददाई वाटणारी गोष्ट म्हणजे छान गर्दी आणि रंगाने बहरलेली बाजारपेठ . तिळगुळ ,मिठाई विविध रंगी पतंग , मांजा फिरक्या आणि त्या खरेदी करणाऱ्या ग्राहकांची गर्दी. खास सुरत, बरेली, मुंबई वरून सर्व गावा गावांना मांजा फिरक्या दाखल झाले आहेत. गतवर्षापर्यंत बरेली मांज्याला प्रचंड मागणी असायची. मात्र, यंदा ही जागा नायलॉन मांज्याने घेतली आहे. नोएडा, दिल्ली, पंजाब, बंगलोर या शहरांतून हा मांजा येतो. मोनोफिल, मोनोकाईट, मोनो गोल्ड, आयबीके, रॅम्बो, चक दे, ड्रॅगन यांसारख्या विविध प्रकारांतील नायलॉन मांजा 80 ते 350 रुपये प्रती रिळ या भावात उपलब्ध आहे. याशिवाय बरेली, पांडा, कुरैशी, स्पेशल मैदानी, टिपू सुलतान, फय्याज बेग यासारख्या विविध प्रकारातील मांजा उपलब्ध आहे. तिळगुळा साठी तिळाचे ढिगारे बाजारातील अजून एक छान आकर्षण, आणि त्या तिळाच्या धीगार्याना सजवायला रंगीत फुलांची आरास वा! बघितल्या बरोबर त्याचे आकर्षण वाटणार नाही असा व्यक्ती क्वचितच बघायला मिळत असेल . हल्ली साखरेच्या ...